11 January 2025 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, Hold करावा की Sell?

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सवर Goldman Sachs ने ‘सेल’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 900 रुपये किमतीवर जाऊ शकतो. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी आपल्या ग्राहकांना अभियांत्रिकी, R&D, उत्पादन संबंधित सेवा व्यवस्थापनासह IT उत्पादन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी प्रामुख्याने ऑटो, एरोस्पेस आणि औद्योगिक उत्पादकांना संशोधन आणि विकास संबंधित सेवा प्रदान करते. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )

मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.24 टक्के वाढीसह 1,002 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

टाटा टेक या जागतिक ऑटो आणि एरोस्पेस कंपनीच्या विश्लेषणात गोल्डमन सॅक्सने नमूद केले आहे की, उपकरणे उत्पादक त्यांचे यांत्रिक R&D बजेट पुढील तीन वर्षांत 5 टक्के CAGR दराने वाढवू शकतात. या सेगमेंटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी ओव्हर-इंडेक्स्ड आहे, म्हणजेच मूळ मेट्रिकपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. उलटपक्षी कॉम्प्युटर एडेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विभागातील बजेट 20 टक्के CAGR दराने वाढत आहे. या विभागामध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनी लोअर-इंडेक्स्ड आहे, म्हणजेच सेगमेंटक्या तुलनेत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची कामगिरी वाईट आहे.

गोल्डमन सॅक्सने माहिती दिली आहे की, टाटा मोटर्स आणि जग्वार लँड रोव्हर कंपनीसोबत चालू असलेले व्यापारी संबंध कंपनीच्या एकूण विक्रीच्या 30 टक्के आहेत. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला ऑटो R&D वर मोठ्या प्रमाणात खर्च करणारे लक्झरी ऑटोमेकर ग्राहक वाढवणे कठीण जात आहे. ब्रोकरेज फर्मने असेही नमूद केले आहे की, टाटा टेक्नॉलॉजी कंपनी एक वर्षाच्या फॉरवर्ड किमतीवर ट्रेड करत आहे. जे कंपनीच्या स्पर्धक कंपन्याच्या तुलनेत दुप्पट आहे.

सोमवारी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1 टक्के घसरणीसह 1,018.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र आज हा स्टॉक किंचित वाढीसह क्लोज झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1400 रुपये या उच्चांक किमतीवरून 30 टक्के खाली आले आहेत. या कंपनीचा IPO शेअर्स 500 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. लिस्टिंगमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies Share Price NSE Live 25 June 2024.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x