25 December 2024 6:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा शेअर स्टॉक मार्केटमधील घसरणीमुळे आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. सोमवारी हा शेअर घसरून घसरून 889.40 रुपयांवर बंद झाला होता. मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज शेअर 2.21 टक्के वाढून 909.10 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 36,869 कोटी रुपये आहे. सोमवारी टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर्समध्ये एकूण ३.७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरमध्ये ०.६ चा बीटा आहे, जो वर्षभरातील अत्यंत कमी अस्थिरता दर्शवितो.

टेक्निकल चार्टवरील शेअरची स्थिती

टेक्निकल चार्टनुसार, ‘टाटा टेक्नॉलॉजीज शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे ‘आरएसआय’ २२.५ इतका आहे. म्हणजे आरएसआय ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये ट्रेड करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शॉर्ट टर्म आणि लाँग टर्ममध्ये देखील टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर घसरला आहे. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा खाली ट्रेड करत आहे.

तज्ज्ञांचा टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत सल्ला

सेबीचे नोंदणीकृत स्टॉक मार्केट विश्लेषक ए. आर. रामचंद्रन यांनी हा शेअरबाबत म्हटलं आहे की, ‘टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर प्राईस खूप घसरलाई आहे, परंतु डेली चार्टवर ९२० रुपयांवर मजबूत रेझिस्टन्ससह खूप ओव्हरसोल्ड असल्याचं दिसत आहे. गुंतवणूकदारांनी १०१६ रुपये टार्गेटसाठी हा स्टॉक होल्ड करावा. शेअरला ८३२ रुपयांवर सपोर्ट मिळत आहे असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

आनंद राठी ब्रोकरेज फर्मचा सल्ला

आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ म्हणाले की, ‘टाटा टेक्नॉलॉजीज शेअरला ८६५ रुपयांवर सपोर्ट आहे आणि रेझिस्टन्स ९३५ रुपयांवर आहे. टाटा टेक्नॉलॉजीज शेअरने ९३५ रुपयांची पातळी ओलांडल्यास तो ९७० रुपयांपर्यंत वाढू शकतो. टाटा टेक्नॉलॉजीज शेअरसाठी शॉर्ट टर्ममध्ये अपेक्षित ट्रेडिंग रेंज ८६५ ते ९७० रुपयांच्या दरम्यान असेल असं देखील आनंद राठी ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price Tuesday 24 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x