18 November 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

ThangaMayil Share Price | थंगामाईल ज्वेलरी शेअर्स गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड मिळणार, संधीचा फायदा घ्या

Thangamayil Share Price

ThangaMayil Share Price | थंगामाईल ज्वेलरी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिल्यानंतर आता मोठी घोषणा केली आहे. या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने कोविड नंतरच्या रिबाउंडमध्ये गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 225 ते 1655 रुपयेपर्यंत वाढली आहे. (Thanga Mayil Jewellery Share Price)

या कालावधीत कंपनीच्या शेअरनी गुंतवणूकदारांना 650 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी थंगामाईल ज्वेलरी कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के वाढीसह 1,670.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

थंगामाईल ज्वेलरी या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 17 जुलै 2023 हा दिवस बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख असे जाहीर केले आहे. यासह ही स्मॉल कॅप कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 6 रुपये अंतिम लाभांश देखील वाटप करणार आहे.

थंगामाईल ज्वेलरी कंपनीने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. बुधवार दिनांक 05 जुलै 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने SEBI नियमावली 2015 नुसार बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट म्हणून 17.07.2023 हा दिवस निश्चित केला आहे.

थंगामाईल ज्वेलरी कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 साठी आपल्या गुंतवणुकदारांना अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 05.07.2023 रोजी पार पडलेल्या कंपनीच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, कंपनीच्या शेअर धारकांनी ठराव मंजूर करून 25 जुलै 2023 रोजी किंवा त्यापूर्वी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरवर 6.00 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

थंगामाईल ज्वेलरी कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 15.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 52.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 50.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्मॉलकॅप स्टॉकची किंमत 62.14 टक्के वाढली आहे. कोविड नंतरच्या पुनर्प्राप्तीमध्ये या कंपनीचे शेअर्स 225 रुपयेवरून वाढून 1655 रुपयेवर पोहचले आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 650 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ThangaMayil Share Price today on 12 July 2023.

हॅशटॅग्स

Thangamayil Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x