19 November 2024 2:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Thermax Share Price | अवघ्या 64,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा देणाऱ्या 'या' शेअरवर नवी टार्गेट प्राईस, पण किती

Thermax Share Price

Thermax Share Price | ऊर्जा आणि पर्यावरण संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या ‘थरमॅक्स’ कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते, मात्र आज या शेअरमध्ये मजबूत पडझड पाहायला मिळाली. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 3.75 टक्के वाढले आहेत. ‘थरमॅक्स’ कंपनीच्या शेअरने दीर्घ काळात अवघ्या 64,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. पुढील काळात या शेअरमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतातील अनेक ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात या कंपनीचे शेअर्स 2790 लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किंमतीच्या तुलनेत हा स्टॉक 21 टक्क्यांनी वाढू शकतो. आज शुक्रवार दिनाक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.23 टक्के घसरणीसह 2,240.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Thermax Limited)

थरमॅक्सचा मल्टीबॅगर परतावा :
22 मार्च 2002 रोजी थरमॅक्स कंपनीचे शेअर्स 14.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 2240 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या काळात ज्या लोकांनी थर्मेक्सच्या कंपनीच्या शेअरवर 64,000 रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती बनले आहेत. मागील एका वर्षात ‘थरमॅक्स’ कंपनीच्या शेअर्सने लोकांना मजबूत नफा कमावून दिला आहे. 19 सप्टेंबर 2022 रोजी हा स्टॉक 2,678.50 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तर 23 डिसेंबर 2022 पर्यंत हा स्टॉक 32 टक्के घसरून 1830.35 रुपये या नीचांकी पातळीवर आला होता. आता मात्र शेअरमध्ये नीचांक परकीवरून 26 टक्के सुधारणा झाली आहे.

स्टॉकची पुढील वाटचाल :
थर्मेक्स कंपनी ग्रीन एनर्जी विभागात व्यापार विस्तार करत आहे. कंपनीच्या एकूण ऑर्डर बुक पैकी 74 टक्के आकार ग्रीन एनर्जी व्यवसायाचा आहे. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाच्या मते 250-300 कोटी रुपयांवरील मोठ्या ऑर्डर्समध्ये घट होत आहे. परंतु कंपनीला विश्वास आहे की लहान आणि मध्यम आकाराच्या ऑर्डर्सद्वारे कंपनीची दीर्घकालीन आवक वाढत राहील. थरमॅक्स कंपनीच्या व्यवसायाचा आतापर्यंतचा सर्वात मजबूत भाग म्हणजे खाजगी क्षेत्राचा भांडवली खर्च हा आहे. याशिवाय कंपनीने आपल्या उत्पादने आणि सेवा व्यवसायाचा विस्तार करण्याचे धोरण आखले आहे. ‘थरमॅक्स’ ही एक कर्जमुक्त कंपनी असून यात अल्प कार्यरत भांडवल चक्र आणि निरोगी ताळेबंद आहे. या स्थितीत ब्रोकरेज फर्म शेअरखानने ‘थरमॅक्स’ कंपनीच्या स्टॉकवर 2,790 रुपये लक्ष किंमत देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Thermax Share Price BSE 500411 on 24 March 2023.

हॅशटॅग्स

Thermax Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x