22 November 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Third Tranche of Bharat Bond ETF | सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा | भारत बाँड ETF उद्या खुला होणार

Third Tranche of Bharat Bond ETF

मुंबई, 02 डिसेंबर | शेअर बाजारातील जोखमीच्या गुंतवणुकीत रस नसेल तर सुरक्षित गुंतवणुकीची संधी चालून आली आहे. कारण नवीन भारत बाँड एक्सचेंज ट्रेडेड फंडचा तिसरा टप्पा ३ डिसेंबर रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. भारत बाँड ईटीएफ हा केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचा (DIPAM) उपक्रम आहे. सामान्य गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये (Third Tranche of Bharat Bond ETF) चांगला परतावा मिळू शकतो.

गुंतवणूक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या भारत बाँड एक्स्चेंज ट्रेडेड फंडाचा दुसरा टप्पा तीनपेक्षा जास्त वेळा सबस्क्राइब झाला. भारत बाँड ईटीएफचा दुसरा टँच जुलै, 2020 मध्ये सादर करण्यात आला होता आणि त्याला गुंतवणूकदारांकडून तीनपट पेक्षा जास्त सबस्क्रिप्शन मिळाले होते. यातून तब्बल 11,000 कोटी जमा झाले. डिसेंबर 2019 मध्ये, पहिल्या टप्प्यात 12,400 कोटी रुपये उभारण्यात आले.

यासंदर्भात एडलवाईस म्युच्युअल फंडने सांगितले की, भारत बाँड ईटीएफच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या विकास योजनेसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी सरकार 5,000 कोटी रुपये उभे करू शकते. भारत बाँड एक्सचेंज ट्रेडेड फंड 3 डिसेंबरला उघडेल आणि 9 डिसेंबरला बंद होईल. हा ETF 15 एप्रिल 2032 रोजी परिपक्व होईल. भारत बाँड ईटीएफ एडलवाइज म्युच्युअल फंडाद्वारे व्यवस्थापित केले जाते. त्याच्या व्यवस्थापनाखाली 36,359 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

केवळ ‘AAA’ रेट प्राप्त असलेल्या बाँडमध्ये गुंतवणूक:
भारत बाँड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या बाँडमध्ये गुंतवणूक करते. हा ETF फक्त ‘AAA’ रेटिंग असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बाँडमध्ये गुंतवणूक करतो.

नवीन फंड ऑफरिंगचा मूळ आकार (NFO-NFO) रु 1,000 कोटी असेल. यामध्ये किमान रु 1000 आणि त्याच्या पटीत गुंतवणूक करता येते. हा बाँड अतिशय सुरक्षित मानला जातो, कारण एक तर तो सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो आणि दुसरे म्हणजे त्याला AAA रेटिंग असते.

Third-Tranche-of-Bharat-Bond-ETF

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Third Tranche of Bharat Bond ETF edelweiss mutual fund investment.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x