18 November 2024 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Tilaknagar Industries Share Price | दारू लय वाईट! पण दारू कंपनीचा शेअर एकदम कडक, 3 वर्षांत 658 टक्के परतावा, खरेदी करणार?

Tilaknagar Industries Share Price

Tilaknagar Industries Share Price | ‘टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताच शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 तिमाहीत ‘टिळकनगर इंडस्ट्रीज’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली असून, कंपनीने 59.09 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. (Tilaknagar Industries Share Price NSE)

मार्च 2022 च्या तिमाहीत ‘टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीने 23.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनी’ मुख्यतः मेड इन इंडिया फॉरेन लिकर बनवण्याचा व्यवसाय करते. आज गुरुवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.63 टक्के (Tilaknagar Industries Share Price Today) वाढीसह 152.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tilaknagar Industries Share Price BSE)

मार्च 2023 तिमाहीत टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनीच्या ऑपरेटिंग उत्पन्नात 37.69 टक्क्यांची वाढ झाली असून, कंपनीने 717.24 कोटी रुपये कमाई केली आहे. मार्च 2022 च्या तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न 521 कोटी रुपये होते. टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनीने सांगितले की, त्यांचा व्यवसाय व्हॉल्यूम आया कोविडपूर्व पातळीच्या पार गेला आहे. मार्च 2023 तिमाहीत ‘टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचा एकूण खर्च 689.64 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

मार्च 2023 तिमाही निकालानंतर ‘टिळकनगर इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सची किंमत सतत वाढत आहे. 3 मे 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 140.95 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर आज गुरुवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.63 टक्के वाढीसह 152.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,543.79 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 153 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत 232 टक्के आणि तीन वर्षांत 658 या कंपनीचे शेअर्स टक्क्यांनी मजबूत झाले आहे. (Tilaknagar Industries Share Price Target 2025)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tilaknagar Industries Share Price today on 18 May 2023.

हॅशटॅग्स

Tilaknagar Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x