5 November 2024 7:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

Tips Industries Share Price | 1 लाख रुपयांवर 20 लाख रुपये परतावा देणारा शेअर स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल

Tips Industries Share Price

Tips Industries Share Price | चित्रपट निर्मिती आणि वितरण क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनी शेअर विभाजन करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 1 : 10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के वाढीसह 1,670.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,162 कोटी रुपये आहे. (Tips Industries Limited)

स्टॉक स्प्लिट प्रमाण :
‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 10 शेअर्समध्ये विभाजित करण्याची योजना आखली आहे. स्टॉक विभाजनानंतर प्रत्येक शेअरहोल्डरला प्रत्येक 1 शेअरवर 10 शेअर्स मिळतील. स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने 21 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.

तिमाही आर्थिक निकाल :
डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने 52.23 कोटी रुपये कमाई केली होती. डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने 45.38 कोटी रुपये कमाई केली होती. कंपनीचा याकाळात निव्वळ खर्च 25.21 कोटी रुपये होता. त्याच वेळी कंपनीचा EBITDA आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत 27.01 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 19.93 कोटी होता.

स्टॉकची कामगिरी :
अलीकडच्या काळात ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित प्रमाणात पडझड पाहायला मिळाली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचवेळी मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 17.40 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. दीर्घ मुदतीसाठी या कंपनीच्या शेअरने लोकांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1982 टक्के परतावा कमावून दिला आहे.

तीन वर्षात पैसे 20 पट वाढले :
मागील तीन वर्षांच्या कालावधीत ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे 20 पट वाढले आहेत. एप्रिल 2020 मध्ये ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 80.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक 1670.25 रुपये किमतीवर पोहचला आहे. जर तुम्ही एप्रिल 2020 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 20 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tips Industries Share Price on 14 April 2023.

हॅशटॅग्स

#Tips Industries Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x