19 November 2024 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Titan Company Share Price | अनेकांना करोडपती करणाऱ्या टायटन शेअरवर तज्ञांनी दिली नवीन टार्गेट प्राईस, खरेदीला गर्दी

Titan Share Price

Titan Company Share Price | काल केंद्रीय बजेट आणि इतर मॅक्रो इकॉनॉमिक डेटामुळे शेअर बाजारात उलथापालथ पाहायला मिळाली. अशा गोंधळाच्या परिस्थितीत जर तुम्ही शेअर मार्केट मधून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने दिलेला सल्ला विचारात घेऊ शकता. त्यांनी टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)

टायटन शेअर तेजीत :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने टायटन कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच त्यांनी 3060 रुपये ही नवीन लक्ष किंमतही जाहीर केली आहे. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के वाढीसह 2,325.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात या स्टॉकमधून गुंतवणूकदारांना स्टॉकमधून 31 टक्के पर्यंत नफा मिळू शकतो असे मत मोतीलाल ओसवाल फर्मने व्यक्त केले आहे. 2023 या नवीन वर्षात टायटन कंपनीचे शेअर्स 9 टक्के पडले आहेत. अशा परिस्थितीत ब्रोकरेज फर्मने स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तिसऱ्या तिमाहीत जबरदस्त व्यापार वाढ :
कंपनीचा स्टँडअलोन व्यवसाय वाढ तिसर्‍या तिमाहीत 12 टक्के राहिला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सणासुदीच्या काळात टायटन कंपनीने जबरदस्त सेल्स केला होता. टायटनच्या ज्वेलरी सेगमेंटने वार्षिक आधारावर सेल्समध्ये 11 टक्के वाढ नोंदवली होती. तर ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, कंपनी पुढील 5 वर्षांत 2.5 पट अधिक वाढ दर्शवू शकते.

दीर्घ मुदतीत बंपर परतावा :
टायटन कंपनीच्या शेअरच्या कामगिरीवर नजर टाकली तर तुम्हाला समजेल की, टायटनचा शेअर मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्क्यापेक्षा अधिक पडला आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉकमध्ये 8 टक्के पेक्षा अधिक पडझड झाली आहे. मागील एका वर्षभरात या स्टॉकची कामगिरी सपाट राहिली होती. परंतु दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे लावून प्रचंड कमाई केली आहे. टायटन कंपनीच्या स्टॉकने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 185% चा मजबूत परतावा कमावून दिला आहे. टायटन कंपनीचे शेअर्स दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे सर्वात आवडते शेअर्स होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Company Share Price 500114 stock market live on 02 February 2023.

हॅशटॅग्स

#Titan Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x