25 December 2024 12:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Titan Share Price | टाटा तिथे नो घाटा! टायटन शेअर्स आज तेजीत, कंपनी गुजरातमध्ये व्यवसाय वाढवणार, नेमकी बातमी काय?

Titan Share Price

Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी टायटन कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 3205.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 3199.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 जुलै 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 3211.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांच्या मते टायटन कंपनीचे शेअर्स पुढील काळात 3570 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के वाढीसह 3,211.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुजरात राज्यात व्यवसाय विस्तार

टायटन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सीके वेंकटरामन यांनी नुकताच एका निवेदनात म्हंटले होते की, टायटन कंपनी पुढील काळात गुजरात राज्यात तनिष्क या ज्वेलरी ब्रँडची 9 स्टोर सुरू करणार आहे. यासह चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी गुजरात राज्यातील तनिष्क स्टोअरची संख्या 28 वर नेणार आहे. टायटन कंपनीने आपले नवीन स्टोअर सुरू करण्यासाठी अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, भुज, वलसाड, सौराष्ट्र या विभागातील काही स्थानाची निश्चिती केली आहे.

परकीय व्यापार विस्तार

टायटन कंपनी पुढील काळात अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह विविध देशांमध्ये आपले ज्वेलरी स्टोअर्स लाँच करण्याची योजना आखत आहे. सीके वेंकटरामन यांनी दिलेल्या माहितीनुसार टायटन कंपनीने आपले तनिष्क स्टोअर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, कतार यासारख्या देशांमध्ये सुरू करण्याचा विचार करत आहे.

पुढील काही महिन्यांत अमेरिकेत डॅलस, ह्यूस्टन आणि शिकागो या शहरांमध्ये तनिष्क आपले नविन स्टोअर्स लाँच करेल. परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांमुळे तनिष्कच्या दागिन्यांची मागणी विदेशात देखील वाढताना पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Share Price today on 11 September 2023.

हॅशटॅग्स

#Titan Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x