15 January 2025 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

Tomato Price Hike | मोदी है तो मुमकिन है! पेट्रोलच नव्हे तर मतदारांच्या दैनंदिन जीवनातील टोमॅटोचा भाव सुद्धा 100 रुपये पार

Tomato Price Hike

Tomato Price Hike | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने इतिहास रचला असून सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाज्या खरेदी करताना सुद्धा दमछाक होतं असून त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतोय. महिना १०-२० हजार रुपये पगार असणाऱ्यांना तर जगणं नकोसं झालं आहे. भारतातील बहुतांश बाजारपेठांमध्ये पूर्वी १० ते २० रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर आता १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात टोमॅटो ६५ ते ७० रुपये किलोने विकला जात होता, तर आठवडाभरापूर्वी ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात होता. त्याचप्रमाणे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ४० ते ५० रुपये किलोच्या आसपास होते. म्हणजे टोमॅटोचे दर दुप्पट झाले आहेत.

मे महिन्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये टोमॅटो दोन ते पाच रुपये किलोने विकला जात होता. आश्चर्याची बाब म्हणजे टोमॅटोच्या दरात महिन्याभरात १९०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टोमॅटोचे दर वाढले!

दिल्लीत टोमॅटो ७० ते १०० रुपये किलो, तर मध्य प्रदेशच्या बाजारात टोमॅटो ८० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात टोमॅटो ८० ते १०० रुपये, राजस्थानमध्ये ९० ते ११० रुपये आणि पंजाबमध्ये ६० ते ८० रुपये दराने विकला जात आहे.

महाराष्ट्रात महिनाभरापूर्वी काय स्थिती होती

महिनाभर पूर्वी टोमॅटोची अवस्था काय होती, याचे उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळाले होते. प्रत्यक्षात येथील उत्पादन बाजारात शेतकऱ्यांनी आणलेल्या टोमॅटोची बोली एक रुपये प्रतिकिलो निश्चित करण्यात आली होती. ते पाहून शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून निषेध केला होता. तर एका महिन्यानंतर याची किंमत 100 रुपयांच्या पातळीवर आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड वाढलेल्या किंमती देखील या महागाईला कारणीभूत आहेत.

टोमॅटोच्या दरात वाढ होण्याचे कारण?

* देशात पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड वाढलेल्या किंमतीमुळे प्रवास खर्चात प्रचंड वाढ
* मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे.
* काही भागात कडाक्याची उष्णता दिसून येत आहे. यामुळेउत्पादनातही घट झाली आहे.
* त्याचप्रमाणे शेजारच्या राज्यांतून टोमॅटोचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे ही एक कारण पुढे केले जात आहे.
* अनेक भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टोमॅटोची पेरणी कमी झाल्याचे बोलले जात आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Tomato Price Hike check details on 27 June 2023.

हॅशटॅग्स

#Tomato Price Hike(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x