Multibagger Stocks | एक काम अन 10 वर्ष थांब तसं नाही, या 5 शेअर्सनी 1 वर्षात 157% पर्यंत परतावा दिला, लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | 2022 हे वर्ष शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष निराशाजनक राहिले आहे. एकीकडे शेअर बाजारातील मोठ मोठ्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांची निराशा केली असून, दुसरीकडे अनेक स्मॉलकॅप कंपन्यांनी आपल्या शेअर धारकांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 5 स्मॉलकॅप कंपन्यांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी मागील दिवाळीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे.
1) दीपक फर्टिलायझर्स :
21 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 1031.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. शेअरची किंमत सध्या आपल्या 1062 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीच्या अगदी जवळ पोहोचली आहे. मागील दिवाळीपासून या कंपनीच्या शेअर्सची किमत 157 टक्क्यांनी वधारली आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर 401.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2) रेणुका शुगर :
रेणुका शुगर कंपनी ही भारतातील सर्वात मोठी साखर उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. 21 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 58.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी, मागील दिवाळीत कंपनीचे शेअर 26.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 122.16 टक्क्यांनी वाढली आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने NSE निर्देशांकावर 68.75 रुपयांची किंमत स्पर्श केली होती, जी या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत आहे.
3) Elgi Equipments :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 10.5 टक्के वाढीसह 491.80 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील महिन्यात या कंपनीच्या शेअर्सनी 566.60 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 3 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर 199.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही या स्टॉकवर पैसे लावले असते तर, आत्तापर्यंत तुम्हाला 146 टक्के परतावा मिळाला असता.
4) भारत डायनॅमिक्स :
NSE निर्देशांकावर मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत डायनॅमिक्स कंपनीचे शेअर 3.74 टक्क्यांनी वाढले होते आणि 956 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील दिवाळीपासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 127 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर 423.75 रुपये किमतीवर व्यवहार करत होते.
5) KPIT टेक्नॉलॉजी :
मागील वर्षीच्या दिवाळीपासून या कंपनीच्या शेअर्सची किमत 105.60 टक्क्यांनी वधारली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 344.75 रुपयांवरून 711 रुपयांच्या पातळीवर गेली आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 801 रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Top Five Multibagger Stocks has Increased since Last year’s Diwali to now on 27 October 2022
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल