17 November 2024 3:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News SIP Calculator | 5 आणि 10 हजाराच्या SIP ने एकूण 10 वर्षांत किती पैसे जमा होतील, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत सकारात्मक संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: RELIANCE
x

Top Investment Schemes | फक्त 500 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या 5 योजना तुम्हाला देतील घसघशीत परतावा, होईल जोरदार कमाई

Top Investment schemes

Top Investment Schemes| सरकार सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अनेक आर्थिक आणि गुंतवणूक योजना राबवते. आज आम्ही या लेखात तुम्हाला अशाच काही गुंतवणूक योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही फक्त 500 रुपयांपेक्षाही कमी पैसे लांबून जबरदस्त गुंतवणूक सुरू करू शकता.

टॉप 5 गुंतवणूक योजना खालीलप्रमाणे : 

सुकन्या समृद्धी योजना :
तुमच्या मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना ही बेस्ट योजना आहे. या योजनेत तुम्हाला सध्या गुंतवणुकीवर 7.6 टक्के परतावा मिळेल.या योजनेत गुंतवणूक केल्यास 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या योजनेत किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवणूक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते :
MIS योजनेचा मॅच्युरिटी कालावधी फक्त 5 वर्षे आहे. यावरील गुंतवणुकीचा सध्याचा व्याजदर वार्षिक 6.6 टक्के आहे, जो तुम्हाला दर महिन्याला दिला जाईल. पोस्ट ऑफिस MIS मध्ये तुम्ही किमान 1000 रुपये गुंतवणूक करून खाते खोलू शकता. एका खात्यासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी 9 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. 10 वर्षांवरील अल्पवयीन आणि जर कोणी व्यक्ती मतिमंद असेल तर यांच्या नावानेही खाते उघडता येते. जर तुम्हाला पोस्ट ऑफिस एमआयएस मुदतीपूर्वी बंद करायचे असेल तर योजना सुरुवात होऊन किमान 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला ही गुंतवणूक बंद करता येईल.

किसान विकास पत्र (KVP) :
छोट्या गुंतवणुकीसाठी हा एक नंबर पर्याय आहे. या बचत योजनेवर सध्या 6.9 टक्के व्याज परतावा उपलब्ध आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास परतावा जबरदस्त असेल परंतु त्यावर तुम्हाला कोणतीही कर सूट उपलब्ध नाही. पूर्वी हे योजना खाते 113 महिन्यांत परिपक्व होत होते,आता त्यासाठी 124 महिन्यांपर्यंत कालावधी लागतो. किसान विकास पत्रात किमान 1000 रुपये पासून गुंतवणूक सुरू करता येते. आणि कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.

म्युच्युअल फंड :
म्युच्युअल फंडात कोणीही गुंतवणूक करू शकतो. फक्त 500 रुपयांच्या किमान मासिक गुंतवणुकीवर तुम्ही 15 वर्षांच्या कालावधीत 10 टक्के व्याजदराने 2 लाख रुपये परतावा मिळवू शकता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार गुंतवणूक कमी जास्त वाढवू देखील शकता. याशिवाय फक्त 90,000 रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीवर तुम्ही 1.10 लाख रुपये परतावा मिळवू शकता. तुम्ही म्युचुअल फंड मध्ये ऑनलाइन देखील गुंतवणूक करू शकता.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकारी गुंतवणूक योजना दीर्घकालीन गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय आहे. सध्या पीपीएफमधील गुंतवणुकीवर वार्षिक 7.1 टक्के चक्रवाढ व्याज परतावा दिला जातो. कारण ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. पीपीएफमध्ये तुम्ही वर्षाला कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकता. PPF खात्यात जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत प्राप्त केले जाऊ शकते. यावर मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त असेल. पीपीएफ ठेवींवर कोणताही कर भरावा लागणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Top Investment schemes for long term benefits and secure return on 20 August 2022.

हॅशटॅग्स

Top Investment schemes(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x