18 April 2025 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Trent Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 13000% परतावा दिला, आता स्टॉकला नवीन टार्गेट प्राईस

Trent Share Price

Trent Share Price | टाटा उद्योग समूह भारतात मीठापासून ते मोटर्सपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करतो. या सर्व कंपन्यांनी आपापल्या क्षेत्रात जबरदस्त छाप सोडली आहे. कमाईच्या बाबतीत, टाटा उद्योग समूहातील अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. टाटा उद्योग समूहाच्या एका कंपनीने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘ट्रेंट लिमिटेड’. मागील 2 दशकात हा पेनी स्टॉक आता मल्टीबॅगर बनला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Trent Share Price | Trent Stock Price | BSE 500251 | NSE TRENT)

मोतीलाल ओसवाल या भारतातील आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसने ‘ट्रेंट’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या साठी तज्ञांनी स्टॉकवर 1500 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी ट्रेंट कंपनीचे शेअर्स 1.03 टक्के वाढीसह 1,339.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच, सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केल्यास 10 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ म्हणाले, ‘ट्रेंट’ कंपनीचे शेअर्स घसरणीवर खरेदी केल्यास मजबूत फायदा होऊ शकतो. या शेअरला 1270 ते 1240 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट आहे. स्टॉक जर 1300 रुपयेच्या खाली गेला तर खरेदीची खरेदीची उत्तम संधी मिळेल. त्याच वेळी, हा स्टॉक वरच्या स्तरावर 1380 रुपयांवर प्रतिकार करत आहे. जर शेअरने ही किंमत पातळी तोडली तर अल्पावधीत शेअर 1440 ते 1470 रुपयेवर जाऊ शकतो.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका वर्षात ट्रेंट कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 20 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात हा स्टॉक 50 टक्के वाढला आहे. ‘ट्रेंट’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1571 रुपये होती. तर नीचांकी पातळी किंमत 983 रुपये होती. 2003 मध्ये या कंपनीचे शेअर 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1339 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 20 वर्षात ट्रेंट.कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 13000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

ट्रेंट लिमिटेड ही रिटेल क्षेत्रात काम करणारी एक सक्रिय कंपनी आहे, जी भारतभर अनेक रिटेल स्टोअर्स चालवत आहे. कंपनी मुख्यतः कपडे, पादत्राणे, उपकरणे इत्यादींच्या किरकोळ विक्री आणि विपणन संबंधित व्यापार करते. या कंपनीची स्थापना 1952 साली झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Trent Share Price 500251 stock market live on 08 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Trent Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या