19 November 2024 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Trident Share Price | अनेकांचं भविष्य बदलू शकेल असा 33 रुपयांचा ट्रायडंट शेअर पुन्हा फोकसमध्ये, का माहिती आहे?

Trident Share Price

Trident Share Price | आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर बाजारात ट्रायडंटच्या नावाचाही समावेश आहे. ट्रायडंटने गेल्या वीस वर्षांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात अनेक पटींनी वाढ केली आहे. ६ जून २००१ रोजी ट्रायडंटच्या एका शेअरची किंमत केवळ पन्नास पैसे होती, ती ५ एप्रिल २००२ रोजी ३५ पैशांवर आली. मात्र आता या शेअरची किंमत 36 रुपयांवर पोहोचली आहे. त्यावेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ती वाढून सुमारे 1.04 कोटी रुपये झाली असती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Trident Share Price | Trident Stock Price | BSE 521064 | NSE TRIDENT)

काल म्हणजेच सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी ट्रायडंट शेअर्स ३३.६५ रुपयांच्या किंमतीवर बंद झाले. शेअर बाजारात या कंपनीच्या शेअर्सचे भाव हळूहळू वाढले आहेत. या कंपनीतील गुंतवणूकदाराची छोटी गुंतवणूकही त्याला करोडपती बनवू शकते. या कंपनीच्या क्षेत्रासाठी केंद्र सरकारने विशेष स्कीम राबविल्याने हा शेअर भविष्यात इतिहास रुचेल असं तज्ज्ञ सांगत आहेत.

हा विक्रमी उच्चांक
18 जानेवारी 2022 रोजी ट्रायडंटच्या शेअरचा भाव 70.90 रुपयांवर पोहोचला होता. त्यावेळी एखाद्या गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक काढून घेतली असती तर २००२ मध्ये गुंतवलेल्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य २.०३ कोटी रुपये झाले असते. अशा प्रकारे हा शेअर एखाद्या गुंतवणूकदाराला छोट्या गुंतवणुकीतून लखपती बनवेल. जानेवारीत विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर ट्रायडंटच्या व्यवसायावर जागतिक परिस्थितीचा परिणाम झाला आणि त्याचे शेअर्स घसरले. सध्या हा शेअर 49 टक्के मोठ्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे.

ट्रायडंट ही कर्जमुक्त कंपनी आहे का?
ट्रायडंट लिमिटेड ही कर्जमुक्त कंपनी नाही. 5 वर्षांपूर्वी 2849 कोटी, 3 वर्षांपूर्वी 2436 कोटींचं कर्ज होतं आणि आता कंपनीकडे जवळपास 1,180 कोटींचे कर्ज आहे. म्हणजे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना कर्ज कमी करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले आणि अशा प्रकारे गुंतवणूकदारांचा विश्वास निर्माण केला.

ट्रायडंटचे प्रतिस्पर्धी कोण आहेत?
केपीआर मिल, वेलस्पन इंडिया आणि आलोक इंडस्ट्रीज हे त्याचे काही प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.

ट्रायडंट स्टॉक स्प्लिट, बोनस, डिव्हिडंड इतिहास :
पूर्वी ट्रायडंट कंपनीच्या शेअरची किंमत खूप महाग असायची, पण शेअर स्प्लिट झाल्यानंतर या शेअरला पेनी स्टॉक्सएवढी किंमत देऊन गुंतवणूकदार मिळू लागले आणि अनेक लोक त्याला पेनी स्टॉक समजत. पण लवकरच गुंतवणूकदारांच्या लक्षात आले की, त्याची फंडामेंटल्स बाकीच्या स्वस्त स्टॉकइतकी कमकुवत नाहीत आणि म्हणूनच ज्यांनी हा शेअर ३ ते ४ रुपयांनी खरेदी केला, ते अजूनही खूप चांगल्या नफ्यावर विराजमान आहेत.

ट्रायडंट कंपनीबद्दल
ट्रायडंट ही एक कंपनी आहे जी बेडशीट आणि टॉवेल बनवते. ही कंपनी कागद, सूत आणि रसायने तयार करण्याचेही काम करते. ट्रायडंटच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हा १० कोटी डॉलरहून अधिकचा जागतिक समूह असून, त्याचा व्यवसाय होम टेक्सटाइल्स, पेपर आणि केमिकल्समध्ये आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती
बीएसईवर उपलब्ध आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षातील पहिली तिमाही ट्रायडंटसाठी चांगली नव्हती. एप्रिल-जून २०२२ या तिमाहीत त्याचा निव्वळ नफा १७३.५५ कोटी रुपयांवरून १२३.८० कोटी रुपयांवर आला. त्याचबरोबर कंपनीचा महसूलही या काळात १,८४७.१४ कोटी रुपयांवरून १६६७.०७ कोटी रुपयांवर आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Trident Share Price in focus again over future plan check details on 27 December 2022.

हॅशटॅग्स

#Trident Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x