20 January 2025 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय शेअर Gold Rate Today | बापरे, लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा की SELL - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट तेजीत, 5 दिवसात 25 टक्के कमाई, पुढेही मालामाल करणार - NSE: IDEA TTML Share Price | 79 रुपयाचा TTML शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 3100% परतावा दिला - NSE: TTML Zero Tax on Salary | महिना पगार 1 लाख रुपये असेल तरी 1 रुपयाही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही, 90% पगारदारांना माहित नाही
x

TTML Share Price | 79 रुपयाचा TTML शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 3100% परतावा दिला - NSE: TTML

TTML Share Price

TTML Share Price | टाटा गृपची कंपनी टीटीएमएल म्हणजे टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. टीटीएमएल शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील ५ दिवसात टीटीएमएल शेअरमध्ये 17.29 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी सुद्धा टीटीएमएल शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे.

टीटीएमएल शेअरने गुंतवणूकदारांना 3,127 टक्के परतावा

सोमवारी टीटीएमएल शेअर 17.29 टक्क्यांनी वधारून 79.08 रुपयांवर पोहोचला होता. सोमवारी शेअरने 81.50 रुपयांचा उच्चांक गाठला होता. तर 75.65 रुपये शेअरचा दिवसभरातील नीचांक होता. मागील पाच वर्षांत टीटीएमएल कंपनी शेअर २.४५ रुपयांवरून 79.08 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीत टीटीएमएल शेअरने गुंतवणूकदारांना 3,127 टक्के परतावा दिला आहे.

टीटीएमएल शेअरची उच्चांकी पातळी

11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल शेअरने 291 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र त्यानंतर शेअरमध्ये घसरण सुरू झाली होती. गेल्या वर्षभरात टीटीएमएल शेअर 9.18 टक्क्यांनी घसरला आहे. आजच्या तेजीमुळे मागील 5 दिवसांत या शेअरने 17.53 टक्के परतावा दिला आहे. टीटीएमएल शेअरची ५२ आठवड्यांचा उच्चांकी पातळी 111.40 रुपये होती , तसेच शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी 65.05 रुपये होती.

टीटीएमएल शेअरची टार्गेट प्राइस

जीआरएम बुल्स ब्रोकरेज फर्मने टीटीएमएल शेअरबाबत संकेत देताना म्हटले आहे की, ‘2025 मध्ये टीटीएमएल शेअर 96 ते 111.40 रुपये टार्गेट प्राइस गाठेल. तसेच टीटीएमएल शेअर लॉन्ग टर्ममध्ये १४५ ते १८० रुपयांची टार्गेट प्राईस गाठेल असे संकेत दिले आहेत. जीआरएम बुल्स ब्रोकरेज फर्मच्या मते टीटीएमएल कंपनीच्या ऑपरेशनल सुधारणा, धोरणात्मक बाजारपेठेची स्थिती आणि सकारात्मक बाजार भावनेमुळे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही विश्लेषकांच्या मते नकारात्मक जोखीम मर्यादित आहे आणि टीटीएमएल कंपनीची सध्याची फंडामेंटल्स लक्षात घेता शेअर प्राईस लवकरच 89 रुपयांचा टप्पा ओलांडेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | TTML Share Price Monday 20 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x