TTML Share Price | टीटीएमएल शेअर्समध्ये पुन्हा तेजी, स्टॉक वाढीचे नेमकं कारण काय? किती फायदा होईल?
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 8 टक्क्यांच्या वाढीसह 91 रुपये किमतीवर पोहचले होते. ( टीटीएमएल कंपनी अंश )
15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 109.10 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 7.74 टक्के वाढीसह 89.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील सहा महिन्यांपासून टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळत होती. मात्र मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स पुन्हा तेजीत आली आहेत. टीटीएमएल कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी 74.36 टक्के वाटा प्रवर्तकांनी धारण केला आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 25.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
टीटीएमएल कंपनीची मुख्य प्रवर्तक कंपनी टाटा सन्स आहे. डिसेंबर तिमाहीपर्यंत टाटा सन्स कंपनीने टीटीएमएल कंपनीचे 38,27,59,467 म्हणजेच 19.58 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीने टीटीएमएल कंपनीचे 94,41,74,817 म्हणजेच 48.30 टक्के भाग भांडवल धारण केले होते. नुकताच टाटा सन्स कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे टाटा सन्स कंपनीला सप्टेंबर 2025 पर्यंत स्टॉक एक्सचेंजेसवर सूचीबद्ध करणे अनिवार्य झाले आहे. म्हणून ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये टाटा सन्सची हिस्सेदारी आहे, त्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TTML Share Price NSE Live 09 March 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC