TTML Share Price | टीटीएमएल शेअर्समध्ये तुफानी तेजी, काल सुद्धा अप्पर सर्किटवर, आजही तेजी, गुंतवणूक करावी का?
TTML Share Price | टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी म्हणजेच TTML कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. इंट्राडे ट्रेडमध्ये हा स्टॉक 9.64 टक्के वाढीसह 92.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा देणाऱ्या TTML स्टॉकमध्ये 291 रुपयेवरून 68 टक्के घसरण झाली आहे.
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 149 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती. आज बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.36 टक्के वाढीसह 89.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर किंमतीचा इतिहास
NSE वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार टीटीएमएल शेअर्स मागील एका वर्षापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 0.87 टक्के घसरली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 15.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. 11 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 291.05 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांकापासून 68 टक्के कमजोर झाला आहे.
कंपनीचे लीगल मॅटर
टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीविरुद्ध भारतातील विविध न्यायालयात 615.41 कोटी रुपये मूल्याचे खटले सुरू आहेत. यामध्ये दूरसंचार विभाग सोबत प्रलंबित खटल्यांमध्ये 265.15 कोटी रुपयेचा दावा दाखल झाला आहे. तर भारत संचार निगम लिमिटेड कंपनी सोबत प्रलंबित खटल्यांमध्ये 156.10 कोटी रुपयेचा दावा दाखल झाला आहे. आणि इतर खटले 91.59 कोटीचे आहेत. याशिवाय जीएसटी विभागाविरुद्ध अनेक प्रलंबित प्रकरणांमध्ये टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीवर करोडो रुपये दंड देखील लावण्यात आला आहे.
कंपनीचा व्यवसाय
टाटा समूहाचा भाग असलेली TTML कंपनी Tata Teleservices कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये तज्ञ आणि लीडर म्हणून ओळखली जाते. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी व्हॉईस, आणि डेटा सेवा प्रदान करण्याचे काम करते. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत दिग्गज कंपन्या देखील सामील आहे. जून 2023 तिमाहीत टीटीएमएल कंपनीने 285.51 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
जून तिमाहीत कंपनीला 301.18 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. एक वर्षभरापूर्वीच्या जून तिमाहीतील निव्वळ तोट्याच्या तुलनेत सध्याच्या तिमाहीत किंचित घट पाहायला मिळाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने 1,106.17 कोटी रुपये महसूल संकलित केला होता आणि कंपनीला 1144 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| TTML Share Price today on 30 August 2023
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल