21 April 2025 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Twitter Blue Tick | ट्विटरवर सोमवारपासून पुन्हा सुरू होणार ब्लू टिकचे सब्सक्रिप्शन, दर महिन्याला पैसे द्यावे लागणार

Twitter Blue Tick

Twitter Blue Tick | ट्विटरने आपली प्रीमियम सेवा ‘ट्विटर ब्लू’ पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा केली आहे. वर्गणीवर आधारित ही सेवा सोमवारपासून सुरू होणार आहे. ट्विटर ब्लूची सब्सक्राइबिंग करणाऱ्या युजर्सना त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर ब्लू-टिक म्हणजेच ब्लू चेकमार्क मिळवण्यासाठी दर महिन्याला ठराविक रक्कम मोजावी लागणार आहे. ट्विटरने या सेवेसाठी वेब युजर्संना दरमहा ८ डॉलर म्हणजे सुमारे ६६० रुपये आणि आयफोन युजर्सकडून ११ डॉलर म्हणजे सुमारे ९०७ रुपये शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे.

ट्विटरने यापूर्वी सब्सक्रिप्शन सेवा सुरू केली होती
ट्विटरने सुमारे एक महिन्यापूर्वी आपली सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली होती, पण त्यावेळी अनेक त्रुटींमुळे हा प्रयत्न फसला. मात्र आता ट्विटरने पुन्हा एकदा जाहीर केले आहे की, सोमवारपासून आपले युजर्स ट्विटर ब्लू सेवेची सदस्यता घेऊ शकतील. सोशल मीडिया कंपनीचं म्हणणं आहे की, या सबस्क्रिप्शन अंतर्गत युजर्सला ब्लू-चेकमार्क व्यतिरिक्त काही खास फिचर्सही दिले जाणार आहेत. सबस्क्रिप्शन सुरू होण्यापूर्वी सरकारी विभाग, अधिकारी, राजकारणी, पत्रकार, कंपन्या अशा काही निवडक लोकांनाच ब्लू-टिक किंवा ब्ल्यू चेकमार्क दिले जात होते.

पडताळणीनंतर कंपनी देणार ब्लू टिक
यावेळी ‘ब्लू टिक सबस्क्रिप्शन सर्व्हिस’ देण्यासाठी कंपनीने काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला वेगळ्या प्रकारचे व्हेरिफिकेशन बेंच देण्यात येणार आहे. त्यानंतरच त्या व्यक्तीला ब्लू टिक देण्यात येणार आहे. यासोबतच चुकीच्या खात्याला ब्लू सब्सक्रिप्शन सेवा मिळू नये यासाठी कंपनी ही सेवा देण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीची पूर्ण पडताळणी करणार आहे.

फेक अकाउंटवर ब्लू-टिकमुळे बंद झाली होती सेवा
४४ अब्ज डॉलरला ट्विटर खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली, ज्यात जो कोणी महिन्याला ८ डॉलर देण्यास तयार असेल त्याला ब्लू टिक मिळू शकते. पण त्यावेळी ट्विटरच्या या सबस्क्रिप्शन सेवेचा फायदा घेऊन अनेक फेक अकाऊंट्सना ब्लू-चेकमार्कही मिळाले. यामध्ये मस्क यांच्या टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांच्या नावे उघडलेल्या बनावट खात्यांचा समावेश आहे. अशा ब्लू-टिक फेक अकाऊंट्सची वानवा होती, ज्यामुळे ट्विटरला आपली सेवा सुरू केल्यानंतर काही दिवसांनी आपली सेवा स्थगित करावी लागली होती.

इलॉन मस्क आता फेक अकाउंटचं काय करणार
ट्विटरने आता पुन्हा एकदा सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, जे युजर्स दर महिन्याला सबस्क्रिप्शनची रक्कम भरतात त्यांना ब्लू-चेकमार्क व्यतिरिक्त इतरही काही फिचर्स दिले जाणार आहेत. यामध्ये कमी जाहिराती आणि इतरांपेक्षा जास्त काळ व्हिडिओ पोस्ट करण्याची सुविधा समाविष्ट आहे. इतकंच नाही तर सबस्क्रिप्शन असलेल्या अकाउंट्सवरून केलेले ट्विट इतरांपेक्षा जास्त ठळकपणे दाखवले जातील. पण यावेळी सबस्क्रिप्शनचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांशी ट्विटर कसे वागणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Twitter Blue Tick relaunching subscriber service charges check details on 11 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Twitter Blue Tick(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या