17 April 2025 7:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
x

Uflex India Share Price | एक बातमी आली आणि हा शेअर 14 टक्के वाढला, पुढे स्टॉकमध्ये मोठ्या हालचाली

Uflex India Share Price

Uflex India Share Price | ‘युफ्लेक्स इंडिया’ या पॅकेजिंग अँड सोल्युशन्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14 टक्के वाढले होते. मात्र आज 2 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के घसरणीसह 411.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या व्यवहारात कंपनीचे या कंपनीचे शेअर्स 429.50 रुपयांवर पोहोचले होते. ‘युफ्लेक्स इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये पडझड होण्याचे कारण म्हणजे, कंपनीच्या कार्यालयात इन्कम टॅक्स विभागाचे छापे पडले होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6.82 टक्के कमजोर झाले आहेत. आयटी छाप्यानंतर स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीने ‘युफ्लेक्स इंडिया’ कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले होते. 28 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीने स्पष्टीकरण दिले की, आयटी विभागाला छाप्यात काहीही मिळाले नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Uflex Share Price | Uflex Stock Price | BSE 500148 | NSE UFLEX)

नेमका प्रकरण काय? :
‘युफ्लेक्स इंडिया’ कंपनीने 500 कोटींचे गैर व्यवहार केल्याची आयटी विभागाला समजले, त्यानुसार आयटी विभागाकडून कंपनीच्या ऑफीसवर छापे मारण्यात आले. यानंतर नोएडा, उत्तर प्रदेश येथील कंपनीची दोन कार्यालये आणि दिल्लीतील शाहदरा कार्यालय आयटी विभागातर्फे सील करण्यात आले. नोएडाबाहेर कंपनीच्या 15 ठिकाणावर छापे टाकण्यात आले, आणि एनसीआरमध्ये 10 ठिकाणी छापेमारी झाली आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण :
युफ्लेक्स इंडिया कंपनीने बुधवारी माहिती दिली आहे की, सलग सात दिवस सुरू असलेल्या आयकर छाप्यांमध्ये कंपनीमधून आयकर विभागाला काहीही चुकीचे आढळले नाही. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, काल्पनिक व्यवहार, पुरावे जप्त, हजारो कोटींची अनियमितता, प्रचंड बेहिशेबी उत्पन्नाचा आरोप करणारे मीडिया वृत्त सर्व काही खोटे आहे. आयकर विभागाला 21 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत ‘युफ्लेक्स इंडिया’ कंपनीमध्ये केलेल्या छापे मारीत सर्व कच्चा माल, तयार वस्तू, इतर मालमत्ता योग्य असल्याचे आढळले आहेत. हिशेबाची सर्व पुस्तकेही बरोबर आढळून आली आहेत.

कंपनीचे तिमाही निकाल :
ऑक्टोबर-डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘युफ्लेक्स इंडिया’ कंपनीने 3,496 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 0.6 टक्के वाढला आहे. या तिमाहीत कंपनीचा PAT 85 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. ‘युफ्लेक्स इंडिया’ ही कंपनी एक बहुराष्ट्रीय फ्लेक्सिबल पॅकेजिंग आणि सोल्युशन्स सर्व्हिस देणारी कंपनी आहे. फ्लेक्सिबल पॅकेजिंग, पॅकेजिंग फिल्म्स, ऍसेप्टिक लिक्विड पॅकेजिंग, होलोग्राफी, प्रिंटिंग सिलेंडर, अभियांत्रिकी आणि रसायने या पॅकेजिंग व्हॅल्यू चेनच्या सर्व विभागात कंपनी सेवा प्रदान करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Uflex India Share Price 500148 UFLEX stock market live on 02 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Uflex India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या