6 January 2025 7:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Union Bank of India Share Price | या सरकारी बँकेची FD जेवढं व्याज 10 वर्षात देईल, तेवढा परतावा याच बँकेचा स्वस्त शेअर 6 महिन्यात देतोय

Union Bank of India Share Price

Union Bank of India Share Price | युनियन बँक ऑफ इंडिया या भारतातील पाचव्या सर्वात मोठ्या बँकच्या शेअर्समध्ये 6 टक्के पेक्षा जास्त तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 6.74 टक्क्यांच्या वाढीसह 102.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत होती.

या सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, रेटिंग एजन्सी केअर रेटिंगने युनियन बँक ऑफ इंडियाचे रेटिंग अपग्रेड केले आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया स्टॉक 5.39 टक्के वाढीसह 101.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

केअर रेटिंग एजन्सीने युनियन बँक ऑफ इंडियाला ‘स्थिर’ मानांकन देऊन त्यांचे रेटिंग अपग्रेड केले आहे. या बँकेचे रेटिंग अपग्रेड होण्यामागील मुख्य कारण म्हणजे, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये बँकेच्या मालमत्तामध्ये सुधारणा झाली आहे, आणि बँकेने मजबूत नफा कमाई केली आहे. तसेच या बँकेने एनपीएबाबत देखील सुधारणा केली आहे. या सर्व सकारात्मक बातमीमुळे तज्ञांनी युनियन बँक ऑफ इंडिया स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.

मागील एका महिन्यात युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया या भारतातील पाचव्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना 122 टक्के परतावा कमावून दिला आहे. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी 41.90 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Union Bank of India Share Price on 23 September 2023.

हॅशटॅग्स

Union Bank of India Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x