16 April 2025 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
x

UPI Without Internet | यूपीआयवर आता इंटरनेट शिवाय पाठवा पैसे, होय हे शक्य आहे, पहा कसे

UPI Without Internet

UPI Without Internet | कोणताही मोठा किंवा छोटा आर्थिक व्यवहार करताना आपन सहज यूपीआय पिनचा उपयोग कतरतो. यात आपल्याला अगदी लांबच्या व्यक्तीला देखील पैसे पाठवता येतात. मात्र हे पैसे पाठवत असताना तुमचे इंटरनेट जलद चालणारे असावे लागते. नेट स्लो असेल तर पेमेंट करता येत नाही. मात्र आता नेटची ही समस्या कायमची बंद होत आहे. डाटा किंवा नेट शिवाय तुम्ही पैसे ट्रांसफर करु शकता. आरबीआयने UPI123Pay हे नवे फिचर लॉन्च केले आहे. याला आता मान्यता देखील मिळाली आहे. यूपीआय लाईट मार्फत आपण नेट शिवाय व्यवहार करु शकणार आहोत.

पाकिटा प्रमाणे करता येणार यूपीआई लाइटचा वापर
यूपीआई लाइट फक्त पिक नाही तर डाउन इंटरनेटमध्ये सुध्दा उत्तम सेवा पुरवेल. यूपीआय प्रमाणेच याचे काम आहे. मात्र त्यापेक्षा जास्त चांगली आणि जलद सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यूपीआई लाइट थेट तुमच्या बॅंक अकाऊंटला लिंक असेल. हे एका ऑन डिवाइज प्रमाणे काम करते. यात महत्वाचे म्हणजे या मार्फत व्यवहार करताना इंटरनेटची आवश्यकता नाही.

सध्या यावर आणखीन काम सुरु आहे. जेव्हा तुम्हाला यूपीआई लाइटचा वापर करायचा असेल तेव्हा त्यात तुम्हाला ऑनलाइन पध्दतीनेच पैसे जमा करावे लागतील. नंतर तुम्ही इंटरनेट शिवाय काम करु शकता. मात्र यात तुम्ही ज्याला पैसे पाठवत आहात ती व्यक्ती ऑनलाइन असायला हवी. तसे नसेल तर लगेच त्या व्यक्तीला पैसे मिळणार नाहीत. जेव्हा ती व्यक्ती ऑनलाइन येईल तेव्हाच पैसे मिळतील.

कोणतीही मर्यादा नाही
यूपीआई लाइटचा वापर तुम्ही कितीही वेळा करु शकता. यात तुम्हाला २००० रु. भरावे लागतील. नंतर कमितकमी २०० रु पाठवता येतील. तसेच दिवसातून तुम्ही कितीही वेळा पैसे पाठवू शकता. एका दिवसात अनेक वेळा २००० रु अकाऊंटवर टाकूण त्यातून तुम्ही व्यवहार करू शकता. यात पैसे पाठवताना तुम्हाला कोणताही पिन टाकण्याची आवश्यकता नाही. कारण ते तुमच्या अकाऊंटशी लिंक असते त्यामुळे पैसे सहज पाठवता येतात.

सध्या या ठिकाणी वापरू शकात यूपीआई लाइट फीचर
हे फिचर सध्या काही निवडक ठिकाणी सुरु करण्यात आले आहे. हे फिचर तुम्ही भिम ऍपवर वापरू शकता. तसेच आठ बॅंकासाठी ही सेवा सुरु आहे. ज्यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एचडीएफसी बॅंक, यूनियन बॅंक, इंडियन बॅंक, कॅनरा बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, अत्कर्श स्मॉल फायनान्स बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक या बॅंकांमध्ये ही सेवा आहे. आता तुमचे या बॅंकेत अकाऊंट असेल तर तुम्ही यूपीआई लाइट फीचरचा वापर करू शकता.

गवर्नर दास यांनी याविषयी सांगितले होते की, यूपीआई लाइट फीचरचा वापर जास्त करुन ग्रामिण विभागातील व्यक्तींना होणार आहे. कारण त्यांच्याकडे महागडे फोन आणि इंटरनेटच्या सुविधा नसतात. त्यामुळे हे फिचर त्यांना खूप फायद्याचे राहिल. साल २०१६ मध्ये सुरु झालेली यूपीआय सेवा आज मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | UPI Without Internet Send money now without internet on UPI 24 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

UPI Without Internet(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या