18 November 2024 9:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

VA Tech Wabag Share Price | VA टेक वाबाग शेअर तेजीत, झुनझुनवाला कुटूंब करतंय मोठी कमाई, शेअरची टार्गेट प्राईस पहा

Highlights:

  • VA Tech Wabag Share Price 
  • VA टेक वाबाग शेअरची सध्याची किंमत
  • VA टेक वाबाग स्टॉक खरेदीचा सल्ला
  • तिमाही निकाल तपशील
  • रेखा झुनझुनवाला यांची देखील गुंतवणूक
VA Tech Wabag Share Price

VA Tech Wabag Share Price | ‘VA टेक वाबाग’ या वॉटर ट्रीटमेंट व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही महिन्यापासून मजबूत वाढीचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. स्टॉकमध्ये ही रॅली मजबूत ऑर्डर बुक, मार्जिन विस्तार यामुळे पाहायला मिळत आहे. VA टेक वाबाग या कंपनीचे शेअर्स 31 मे 2023 रोजी 459.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

VA टेक वाबाग शेअरची सध्याची किंमत

एक वर्षापूर्वी हा स्टॉक 247.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. याकाळात शेअरची किंमत 85 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 2 जुन 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.11 टक्के वाढीसह 464.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

VA टेक वाबाग स्टॉक खरेदीचा सल्ला

ब्रोकरेज फर्म शेअरखानने VA टेक वाबग कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 520 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. सुनिधी सिक्युरिटीज फर्मने या स्टॉकची किंमत 592 रुपये निश्चित केली आहे. यासोबतच त्यांनी या शेअरला बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअरखान फर्मच्या तज्ज्ञांच्या मते, कच्च्या मालाची किंमत आणि इतर खर्चात घट झाल्यामुळे कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात 51.7 टक्क्यांच्या वाढ झाली आहे. कंपनीच्या ऑपरेटींग नफा 108 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

तिमाही निकाल तपशील

आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत VA टेक वाबाग कंपनीला 111 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत VA टेक वाबाग कंपनीने 46.30 कोटी रुपये नफा कमावला होता. तथापि कंपनीची विक्री 3.92 टक्क्यांच्या वाढीसह 926.86 कोटी रुपयेवर पोहचली आहे.

रेखा झुनझुनवाला यांची देखील गुंतवणूक

दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी देखील या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली.आहे. त्यांच्याकडे मार्च तिमाहीपर्यंत VA टेक वाबाग कंपनीचे 8.04 टक्के म्हणजेच 50 लाख शेअर्स होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | VA Tech Wabag Share Price today on 02 June 2023.

हॅशटॅग्स

VA Tech Wabag Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x