10 January 2025 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर उच्चांकी पातळीवरून 18 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून स्टॉकबाबत महत्वाचे संकेत - NSE: VEDL Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

Vedanta Share Price | वेदांता शेअर उच्चांकी पातळीवरून 18 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून स्टॉकबाबत महत्वाचे संकेत - NSE: VEDL

Vedanta Share Price

Vedanta Share Price | शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. दुसरीकडे, वेदांता लिमिटेड कंपनी शेअर एका महिन्यात विक्रमी उच्चांकी पातळीवरून १८ टक्क्यांनी घसरला आहे. 16 डिसेंबर 2024 रोजी वेदांताचा लिमिटेड कंपनी शेअर 527 रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.

शुक्रवारच्या सत्रात वेदांता कंपनी शेअर 426.40 रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला. दुसरीकडे, वेदांता लिमिटेड कंपनी शेअर 13 मार्च 2024 रोजी 249.50 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून 72 टक्क्यांनी वाढला आहे.

वेदांता लिमिटेड कंपनी शेअर प्राइस ऍक्शनच्या दृष्टीने कमकुवत दिसत आहे. वेदांता लिमिटेड कंपनी शेअर्स 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी ट्रेड करत आहेत. वेदांता लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप १.६७ लाख कोटी रुपयांच्या खाली घसरले आहे.

आनंद राठी ब्रोकरेज फर्म – वेदांता शेअर टार्गेट प्राईस

आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ जिगर एस पटेल म्हणाले की, ‘वेदांता शेअरची सपोर्ट लेव्हल 420 रुपये आणि रेझिस्टन्स 465 रुपये असेल. वेदांता शेअरने ४६५ रुपयांची पातळी ओलांडल्यास पुढे ४८० रुपयांवर वाढू शकतो. तसेच वेदांता कंपनी शेअरची शॉर्ट टर्मसाठी अपेक्षित ट्रेडिंग रेंज ४२० ते ४७० रुपयांच्या दरम्यान असेल असं ब्रोकरेजने म्हटलं आहे.

वेदांता शेअरबाबत तज्ज्ञांकडून संकेत

सेबीचे नोंदणीकृत स्टॉक मार्केट विश्लेषक ए. आर. रामचंद्रन वेदांता शेअरबाबत म्हणाले की, ‘वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत डेली चार्टवर किंचित मंदीचे संकेत आहे. डेली चार्टवरील संकेतानुसार शेअर ४३८ रुपयांच्या खाली घसरल्यास नजीकच्या काळात ४०४ रुपये पर्यंत घसरू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vedanta Share Price Friday 10 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(46)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x