18 November 2024 8:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Vedanta Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर

Vedanta Share Price

Vedanta Share Price | खाण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म नुवामाच्या तज्ञांनी वेदांता लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात. आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 272.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुवामा फर्मच्या तज्ञांनी वेदांता कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 394 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 28 फेब्रुवारी 2024 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 262 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 301 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 208 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 98,896 कोटी रुपये आहे. ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने वेदांता कंपनीच्या शेअर्सवर 318 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

तज्ञांच्या मते, वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स सकारात्मक वाढीचे संकेत देत आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 हे कंपनीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षामध्ये कंपनीने कर्ज कमी करणे, ॲल्युमिनियम आणि झिंकचा प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विस्तार पूर्ण करणे आणि डिमर्जर या सर्व योजनांची आखणी करून ठेवली आहे.

ब्रोकरेज फर्मनुसार, वेदांता लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 3 अब्ज डॉलर्स कर्ज कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात स्टील आणि लोह धातू व्यवसायाचे मुद्रीकरण आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत केले जाईल. यातून कंपनीला 2 अब्ज डॉलर्स उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. याशिवाय आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये वेदांता लिमिटेड कंपनी 40 रुपये लाभांश जारी करू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vedanta Share Price NSE Live 02 March 2024.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x