Vibhor Steel Tubes IPO | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल कमीतकमी 86 टक्के परतावा, संधी सोडू नका

Vibhor Steel Tubes IPO | विभोर स्टील ट्यूब्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 15 फेब्रुवारी रोजी बंद केला जाईल. तुम्ही उद्या पर्यंत या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकता. विभोर स्टील ट्यूब्स कंपनीच्या IPO चा आकार 72 कोटी रुपये आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 141-151 रुपये निश्चित केली आहे.
विभोर स्टील ट्यूब्स कंपनीने IPO लाँच करण्यापूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 21 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, विभोर स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 130 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
जर हा स्टॉक अप्पर प्राईस बँडवर वाटप करण्यात आला तर, ग्रे मार्केट प्रीमियम किमतीच्या अनुषंगाने गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी 86 टक्के नफा मिळू शकतो. विभोर स्टील ट्यूब्स कंपनीच्या IPO मधील आकर्षक किंमती आणि आशावादी व्यावसायिक दृष्टीकोन यामुळे अनेक तज्ञांनी या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. विभोर स्टील ट्यूब्स कंपनीने मागील काही वर्षांत जबरदस्त आर्थिक कामगिरी केली आहे.
विभोर स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या IPO मध्ये 50 टक्के कोटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवला आहे. तर 15 टक्के कोटा गैर-संस्थात्मक बोलीदारांसाठी राखीव ठवेला आहे. 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. विभोर स्टील ट्यूब्स ही कंपनी मुख्यतः माईल्ड स्टील ERW ब्लॉक आणि गॅल्वनाइज्ड पाईप्स, होलो स्टील पाईप्स, कोल्ड रोल्ड स्टील स्ट्रिप्सचे उत्पादन आणि निर्यात संबंधित व्यवसाय करते.
या कंपनीची विविध उत्पादने स्टील पाईप्स, नळ्या, फ्रेम्स आणि शाफ्टसाठी, सायकल फ्रेम्ससाठी, फर्निचरसाठी, शॉकर्ससाठी, विविध संरचनात्मक हेतूंसाठी, तसेच अभियांत्रिकी हेतूंसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. विभोर स्टील ट्यूब्स कंपनीच्या टीममध्ये काम करणाऱ्या सदस्यांची संख्या 640 आहे. ही टीम कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण, कच्चा माल तसेच अंतिम उत्पादनांची सर्व गुणवत्तेच्या मापदंडांवर चाचणी करण्याचे काम करते.
विभोर स्टील ट्यूब्स कंपनी IPO मधून जमा होणारी रक्कम कंपनीच्या खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांची पूर्तता करण्यासाठी खर्च करणार आहे. चालू आर्थिक वर्षात विभोर स्टील ट्यूब्स कंपनीचा ऑपरेशनल महसूल वार्षिक आधारे 36 टक्के वाढीसह 1,113 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीचा निव्वळ नफा जवळपास दुप्पट वाढून 21.06 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
सप्टेंबर 2023 मध्ये संपलेल्या सहामाहीत विभोर स्टील ट्यूब्स कंपनीने 530 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यात कंपनीचा निव्वळ नफा 8.52 कोटी रुपये नोंदवला गेला होता. विभोर स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या IPO साठी खंबाट्टा सिक्युरिटीज फर्मला बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. तर Kfin Technologies कंपनीला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vibhor Steel Tubes IPO GMP 14 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL