18 November 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Vikas Ecotech Share Price | शेअरची किंमत 4 रुपये! हा पेनी शेअर गुणाकारात पैसा वाढवतोय, चिल्लर गुंतवून खरेदी करणार?

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक स्टॉक चार टक्क्यांच्या वाढीसह 3.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 353 अंकांच्या घसरणीसह 71,557 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 105 अंकांच्या घसरणीसह 21,560 अंकांवर ट्रेड करत होता. आज गुरुवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी विकास इकोटेक स्टॉक 3.85 टक्के वाढीसह 4.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

विकास इकोटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 541 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.35 रुपये होती. मागील 1 महिन्यात, विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्सची किंमत 22 टक्के वाढली आहे. नुकताच विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने वृंदा अॅडव्हान्स्ड मटेरिअल्स लिमिटेड कंपनीच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यासह प्राइस वॉटर हाऊस कूपर्स अँड कंपनी एलएलपी फर्मला सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, वृंदा अॅडव्हान्स्ड मटेरियल्स लिमिटेड कंपनीच्या एकत्रीकरण प्रस्तावाची तपासणी करण्यासाठी प्राइस वॉटर हाऊस कूपर्स अँड कंपनी एलएलपी फर्मला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. Vrinda Advanced Materials Limited या कंपनीची स्थापना 2007 साली झाली होती.

या कंपनीची उत्पादन सुविधा केंद्र राजस्थान राज्यात स्थित आहेत. ही कंपनी मुख्यतः विशेष पॉलिमर संयुगे, कृषी उत्पादनांचा व्यापार करते. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीने 192.1 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर त्यात कंपनीने 9.35 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वृंदा अॅडव्हान्स्ड मटेरियल्स ही एक कर्जमुक्त कंपनी असून तिची एकूण संपत्ती 69.14 कोटी रुपये आहे.

31 ऑगस्ट 2023 रोजी विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने भाग भांडवल 200 कोटी रुपयेपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक पार पडली होती. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने यावर्षी संपूर्णपणे कर्जमुक्त होण्याची योजना आखली आहे. आत्तापर्यंत, कंपनीने आपले बरेच कर्ज परतफेड केले आहे, आणि याचा कंपनीच्या निव्वळ नफ्यावर सकारात्मक परिणाम होत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price NSE Live 04 January 2024.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x