24 January 2025 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये! विकास लाइफ केअर कंपनीने सेबीला दिली महत्वाची माहिती, शेअर्स तेजीत येणार?

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना अफाट कमाई करून दिली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 2.29 टक्क्याच्या वाढीसह 6.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. मात्र आज या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. विकास लाइफ केअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 959 कोटी रुपये आहे.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर स्टॉक 1.52 टक्के घसरणीसह 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 दिवसात विकास लाईफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सची किंमत 31 टक्के वाढली आहे. मागील 6 महिन्यांत विकास लाईफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 120 टक्के वाढवले आहे.

सेबीला दिलेल्या माहितीनुसार विकास लाइफ केअर कंपनीच्या निधी उभारणी समितीची 10 जानेवारी 2024 रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये कंपनीच्या संचालकांनी पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे भांडवल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने पात्र संस्थात्मक प्लेसमेंटला 4.18 रुपये प्रति इक्विटी शेअर किमतीवर शेअर्स इश्यू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्लेसमेंटसाठी शेअर्सची फ्लोअर प्राइस 5.02 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनी आपल्या पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना 10.41 कोटी इक्विटी शेअर्स जारी करून भांडवल उभारणी करणार आहे. विकास लाइफ केअर कंपनी ग्लोबल अपॉर्च्युनिटीज फंड, एजी डायनॅमिक फंड आणि नक्षत्र स्ट्रेस्ड अॅसेट फंड या FPI श्रेणीतील तीन गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स जारी करेल.

विकास लाइफकेअर लिमिटेड ही कंपनी मुख्यतः विषमुक्त विशेष रसायनांचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना विशेष रासायनिक उपाय सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची विशेष रसायने गंभीर अन्न आणि पिण्याच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनी पॉलिमर आणि रबर घटकांचे उत्पादन आणि व्यापार आणि प्लास्टिक, सिंथेटिक आणि नैसर्गिक रबरसाठी विशेष ऍडिटीव्ह संबंधित उत्पादने बनवण्याचा व्यावसायात गुंतलेली आहे. विकास लाइफ केअर कंपनीने नुकताच कच्च्या मालाच्या संबंधित कामकाजात विविधता आणून B2C विभागात देखील प्रवेश केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 12 January 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x