Vikas Lifecare Share Price | 6 रुपयाचा शेअर मालामाल करणार? विकास लाइफ केअर कंपनीचा व्यवसाय विस्तार, फायदा होणार?
Vikas Lifecare Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स 26 अंकांच्या घसरणीसह 72,597 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 8 अंकांच्या घसरणीसह 22047 अंकांवर क्लोज झाला होता. सुरुवातीच्या काही तासात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो हे निर्देशांक तेजीत व्यवहार करत होते. आणि निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
शेअर बाजारातील अशा तेजी मंदीच्या काळात अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक आहे, विकास लाइफ केअर लिमिटेड. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीची सहयोगी कंपनी पीएमई एंटरटेनमेंटने दुबईमध्ये दोन मोठे कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती सेबीला कळवली आहे.
PME एंटरटेनमेंट ही कंपनी विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीची उपकंपनी असून 27 एप्रिल 2024 रोजी दुबईमध्ये कोका-कोला एरिना नावाचा एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध भारतीय गायक अरिजित सिंग गायनाचा कार्यक्रम करणार आहे.
आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 26 मे 2024 रोजी PME एंटरटेनमेंट कंपनी आणखी एक कार्यक्रम करणार असून त्यात प्रसिद्ध कवी डॉक्टर कुमार विश्वास आपल्या कविता सादर करणार आहेत.
विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, “अरिजित सिंगचे चाहते भारतातच नाही जगभरात पसरले आहे. अरिजित सिंगने शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, सनी देओल, शाहिद कपूर आणि रणबीर कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या चित्रपटात पार्श्वगायन केले आहे”.
डॉ. कुमार विश्वास हे देखील भारतातील प्रसिद्ध कवी आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून नावाजलेले व्यक्ति आहेत. डॉक्टर कुमार विश्वास त्यांच्या कार्यक्रमात लोकांची तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. या दोन्ही इव्हेंटचे तिकीट मोठ्या प्रमाणात खरेदी व्हायला सुरुवात झाली आहे. विकास लाइफ केअर कंपनीला अपेक्षा आहे की हे दोन्ही कार्यक्रम जबरदस्त गाजतील आणि कंपनीला त्याचा फायदा होईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 23 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल