Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 7 रुपये, हा शेअर श्रीमंत बनवू शकतो? कंपनीने सेबीला दिली महत्वाची माहिती
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच विकास लाइफकेअर कंपनीने दुबईस्थित स्काय 2.0 क्लबमध्ये 79 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 650 कोटी रुपये गुंतवणूक करून 60 टक्के वाटा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. विकास लाइफकेअर कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटपर्यंत ही अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 6.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 118 टक्के मजबूत झाले आहेत. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 11.19 टक्के वाढीसह 7.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
विकास लाइफकेअर आणि दुबईस्थित ब्लू स्काय इव्हेंट हॉल्स एफझेड-एलएलसी यांच्यात शेअर स्वॅप डील झाली आहे. ही डील स्काय 2.0 क्लब व्यवसायात 60 टक्के भाग भांडवल अधिग्रहण करण्या संबंधित आहे. सेबीला दिलेल्या माहितीनुसार स्काय 2.0 क्लब हा पश्चिम आशिया आणि आशियातील सर्वात मोठा नाईट क्लब म्हणून प्रसिद्ध आहे.
नुकताच विकास लाइफकेअर कंपनीने 108 कोटी रुपये गुंतवणुक करून स्मार्ट मीटर उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. विकास लाइफकेअर कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाणारी जेनेसिस गॅस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीसोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. या संयुक्त उपक्रमाचे नाव, IGL जेनेसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड असे ठेवण्यात आले आहे.
विकास लाइफकेअर ही कंपनी मुख्यतः पॉलिमर आणि रबर कंपाऊंड्स आणि प्लास्टिक, सिंथेटिक आणि नैसर्गिक रबरसाठी विशेष अॅडिटीव्हचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. नुकताच विकास लाइफकेअर कंपनीने B2C व्यवसाय विभागात देखील एन्ट्री केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 23 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल