18 November 2024 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 7 रुपये, विकास लाइफकेअर कंपनीबाबत सकारत्मक बातमी, खरेदीला ऑनलाईन गर्दी

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढीसह 7.92 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे.

विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, त्यांनी दुबईस्थित SKY 2.0 क्लबमधील 60 टक्के भाग भांडवल 79 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 650 कोटी रुपये गुंतवणूक करून खरेदी केले आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 4.11 टक्के वाढीसह 7.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार, “विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनी आणि मेसर्स ब्लू स्काय इव्हेंट हॉल्स एफझेड-एलएलसी यांच्यात स्काय 2.0 क्लब व्यवसायातील 60 टक्के भागभांडवल अधिग्रहण करण्यासाठी शेअर स्वॅप करार संपन्न झाला आहे. 130 दशलक्ष डॉलर्सच्या एंटरप्राइझ मुल्यांकनावर संबंधित व्यवसाय विभागातील अधिग्रहण प्रक्रिया या आर्थिक वर्षात संपादन केली जाईल”.

नुकताच विकास लाइफकेअर कंपनीने सेबीला माहिती दिली की, त्यांनी 108 कोटी रुपये गुंतवणुक करून स्मार्ट मीटर मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी जॉइंट व्हेंचर व्यवसाय स्थापन केला आहे. विकास लाइफकेअर कंपनीची उपकंपनी असलेल्या जेनेसिस गॅस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीसोबत IGL जेनेसिस टेक्नॉलॉजी हा संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे.

मागील एका महिन्यात विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 132.26 टक्के वाढली आहे. याकाळात शेअर्सची किंमत 3 रुपयेवरून कमी करून सध्याच्या किमतीवर आली आहे.

मागील पाच वर्षांत विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 179 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7.92 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.66 रुपये होती. विकास लाइफकेअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,114.21 कोटी रुपये आहे.

विकास लाइफकेअर ही कंपनी मुख्यतः पॉलिमर आणि रबर कंपाऊंड्स आणि प्लास्टिक, तसेच सिंथेटिक आणि नैसर्गिक रबरसाठी उपयोगात येणारे विशेष अडिटीव्ह्स बनवण्याचा व्यवसाय करते. विकास लाइफकेअर कंपनीने नुकताच B2C व्यवसाय विभागात एन्ट्री केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 24 January 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x