13 November 2024 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

Vinyas Innovative Share Price | श्रीमंत करणारा शेअर! विन्यास इनोव्हेटिव्ह शेअरने फक्त 1 दिवसात 100% परतावा दिला, खरेदी करणार?

Vinyas Innovative Share Price

Vinyas Innovative Share Price | विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंग होताच या कंपनीच्या शेअरने बाजारात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी IPO स्टॉक 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची इश्यू किंमत 165 रुपये होती. आता हा स्टॉक 100 टक्के प्रीमियम वाढीसह 330 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आहे.

बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 ते 3 ऑक्टोबर 2023 दरम्यान विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी स्टॉक 4.54 टक्के वाढीसह 362.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 62 ते 165 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 800 इक्विटी शेअर्स ठेवले होते. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. IPO सबस्क्रिप्शनचा चौथ्या दिवशी हा स्टॉक 43.24 पट अधिक खरेदी करण्यात आला होता. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 95.16 पट अधिक खरेदी केला गेला होता. तर QIB चा राखीव कोटा 42.74 पट अधिक खरेक केला गेला होता.

या कंपनीने आपल्या IPO मध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत 2203200 शेअर्स जारी केले होते, त्यावर कंपनीला 952,62,400 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली होती. पहिल्या दिवशी हा IPO 23 टक्के सबस्क्राईब झाला होता. तर दुसऱ्या दिवशी या कंपनीच्या IPO ला 37 टक्के मागणी प्राप्त झाली होती. तिसऱ्या दिवशी हा IPO स्टॉक 3.19 पट खरेदी झाला होता.

विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रॉनिक सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी डिझाइन उत्पादन, जागतिक मूळ उपकरणे उत्पादन कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी आणि डिझाइन संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vinyas Innovative Share Price today on 09 October 2023.

हॅशटॅग्स

Vinyas Innovative Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x