16 April 2025 9:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Vivanta Industries Share Price | चारही बाजूने कमाई! विवांता इंडस्ट्रीज शेअरवर डिव्हीडंडसह फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड तारीख सेव्ह करा

Vivanta Industries Share price

Vivanta Industries Share Price | विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड या बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक मायक्रोकॅप कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 51.20 कोटी रुपये आहे. गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.85 टक्के घसरणीसह 5.12 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सेबी माहिती कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअर धारकांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि कंपनीने शेअरच्या दर्शनी किमतीवर 3 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 5.37 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

बोनस शेअर्स आणि लाभांश तपशील :

विवांता इंडस्ट्रीज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने 2023 च्या आर्थिक वर्षासाठी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरवर 3 टक्के अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासह कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे. 4 : 1 या गुणोत्तराचा अर्थ, ज्यां गुंतवणूकदारांकडे विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे 4 शेअर्स असतील त्यांना बोनस म्हणून कंपनी 1 शेअर्स मोफत देणार आहे. या बोनस शेअर्स वाटपासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 5 सप्टेंबर 2023 हा दिवस जाहीर एकला आहे.

कंपनीचे आर्थिक निकाल :

जून 2023 तिमाहीत विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 14.08 कोटी रुपये कमाई केली होती. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 0.12 कोटी रुपये कमाई केली होती. जून 2023 तिमाहीमध्ये कंपनीचा एकूण खर्च 13.75 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 0.08 अधिक आहे. विवांता इंडस्ट्रीज कंपनीने जून 2023 तिमाहीत 33 लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने फक्त 3 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. विवांता इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 208.43 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 150.98 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vivanta Industries Share price today on 05 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Vivanta Industries Share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या