18 November 2024 9:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Vivanta Industries Share Price | विवांता इंडस्ट्रीज शेअर अप्पर सर्किटवर! फ्री मोफत बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड मिळणार, खरेदी वाढणार

Vivanta Industries Share Price

Vivanta Industries Share Price | विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही महिन्याभरापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. घसरण होत आहे. आता विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. यासह कंपनी लाभांशही वाटप करण्याचा विचार करत आहे. (Vivanta Share Price)

शुक्रवारी 4 ऑगस्ट 2023 रोजी विवांता इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी विवांता इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के वाढीसह 5.63 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. विवांता इंडस्ट्रीज या मायक्रो कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 51.20 कोटी रुपये आहे.

बोनस शेअर्स प्रमाण :

विवांता इंडस्ट्रीज या बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या मायक्रो कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या शेअर धारकांना दर्शनी मूल्यावर 3 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासह कंपनीने पात्र गुंतवणुकदारांना रेकॉर्ड तरिखच्या अधीन राहून 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

विवांता इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करण्यासाठी 5 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. या निर्णयां संबंधित प्रस्ताव कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअर धारकांच्या मंजुरीसाठी मांडला जाईल.

तिमाही कामगिरी :

मागील वर्षी जून 2022 तिमाहीत विवांता इंडस्ट्रीज कंपनीने 0.12 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर आता जून 2023 तिमाहीत कंपनीने 14.08 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षात जून 2022 तिमाहीमध्ये कंपनीचा एकूण खर्च 0.08 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर जून 2023 तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 13.75 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

जून 2023 तिमाहीमध्ये विवांता इंडस्ट्रीज कंपनीने 33 लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे. विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 231.18 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 151.34 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vivanta Industries Share Price today on 07 August 2023.

हॅशटॅग्स

Vivanta Industries Share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x