Vodafone Idea Kumar Mangalam Birla Infuse Own Capital | कुमार मंगलम बिर्ला हे कंपनीत टोकन गुंतवणूक करण्याची शक्यता
मुंबई, 12 ऑक्टोबर | सध्या व्होडाफोन-आयडिया ही कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सरकारच्या निर्णयामुळे कंपनीला दिलासा मिळाला असला तरी कंपनीसमोरील आव्हानं मात्र संपलेली नाहीत. व्होडाफोन आयडियाचं बाजारातील अस्थित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये अधिक पैसा गुंतवण्याची गरज आहे. दरम्यान, कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला हे कंपनीतील आपला विश्वास वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा भरवसा वाढवण्यासाठी टोकन गुंतवणूक ((Vodafone Idea Kumar Mangalam Birla Infuse Own Capital) करण्याची शक्यता आहे.
Vodafone Idea Kumar Mangalam Birla Infuse Own Capital. Aditya Birla Group chairman and billionaire Kumar Mangalam Birla is expected to infuse a token sum of less than ₹1,000 crore into Vodafone Idea :
मनीकंट्रोलला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुमार बिर्ला कंपनीमध्ये १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करू शकता. व्होडाफोन आयडियाला सरकारच्या निर्णयानंतर मिळालेल्या दिलास्यानंतर कंपनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे. अशा स्थितीत प्रमोटर बिर्ला यांच्याकडून गुंतवणूक झाल्यावर अन्य गुंतवणूकदारांमधील आत्मविश्वास वाढेल आणि ते संकटाचा सामना करणाऱ्या कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी पुढे येऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मनीकंट्रोलनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार कंपनीमध्ये प्रमोटर व्होडाफोन पीएलसी आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या वतीने १० हजार कोटी रुपये इतकी मोठी रक्कम गुंतवण्यासाठी सरकार आणि Vodafone-Idea (Vi) यांच्यात कोणताही करार झालेला नाही. यापूर्वी बिर्ला यांनी व्होडाफोन आयडियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु दूरसंचार क्षेत्रासाठी मदतीसाठी सरकारचं मन वळवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोकन गुंतवणूक बिर्ला समूहाच्या कोणत्या लिस्टेड कंपनीद्वारे होऊ शकते. परंतु कुमार मंगलम बिर्ला ही गुंतवणूक आपलं स्वामित्व असलेल्या कोणत्याही कंपनीद्वारे वैयक्तीक स्वरूपात करू शकतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Vodafone Idea Kumar Mangalam Birla Infuse Own Capital a token sum of less than 1000 crore into company.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC