20 April 2025 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअर प्राईसवर होणार परिणाम, जेएम फायनान्शिअलने दिले महत्वाचे संकेत - SGX Nifty

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी शेअर बाजार घसरणीसह खुला (NSE: IDEA) झाला होता. सुरुवातीला स्टॉक मार्केट सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी ८० अंकांच्या घसरणीसह ट्रेड (Gift Nifty Live) करत होता. सोमवारी बँक निफ्टीतही १६० अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने वोडाफोन आयडिया कंपनीबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (वोडाफोन आयडिया कंपनी अंश)

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?

जेएम फायनान्शिअलने म्हटले आहे की, वोडाफोन आयडिया कंपनीच्या नुकत्याच संपलेल्या 24,000 कोटी रुपयांच्या इक्विटी फंडरेजिंगमुळे कंपनीबाबत शॉर्ट टर्ममध्ये सकारात्मक संकेत मिळत आहेत. मात्र लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून वोडाफोन आयडिया कंपनीला शाश्वत टेलिकॉम कंपनीमध्ये रूपांतरित होण्यासाठी अनेक सकारात्मक घडामोडी आवश्यक आहेत.

वोडाफोन आयडिया कंपनीचा एआरपीयू आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 380 रुपयांपर्यंत वाढणे आवश्यक आहे, जो दुसऱ्या तिमाहीत 156 रुपये होता. कारण त्यामुळेच आर्थिक वर्ष 2027-31 मध्ये भारत सरकारला वार्षिक 43,000 कोटी रुपयांच्या देयक दायित्वाची पूर्तता करता येईल. तसेच आर्थिक वर्ष २०२६ मध्ये वोडाफोन आयडिया कंपनीला २९,१०० कोटी रुपये भरावे लागतील.

जेएम फायनान्शिअलच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीला भारत सरकारच्या थकबाकीतून अंशत: दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तसेच नवीन दूरसंचार कायदा 2023 नुसार कर्जमाफी नाकारली जाऊ शकते.

याशिवाय, वोडाफोन आयडिया कंपनीचा कायापालट दीर्घ मुदतीत भांडवली खर्चात वार्षिक १०,०००-१५,००० कोटी रुपयांपर्यंत किंवा महसुलाच्या १५-२० टक्के अंतर्गत सकारात्मक वाढ करण्याच्या क्षमतेवरही अवलंबून असेल असं जेएम फायनान्शिअलने म्हटलं आहे.

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने वोडाफोन आयडिया शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग कायम ठेवताना १० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मात्र, जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते या शेअरमध्ये तेजी आल्यास तो १५ रुपये टार्गेट प्राईसपर्यंत वाढू शकतो.

शेअर 6 महिन्यात 47.88% घसरला आहे

मागील ५ दिवसात वोडाफोन आयडिया शेअरने 8.88% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात वोडाफोन आयडिया शेअरने 5.84% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 47.88% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 36.58% घसरला आहे. तसेच YTD आधारावर वोडाफोन आयडिया शेअर 50.94% घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 20.87% परतावा दिला आहे. मात्र, लॉन्ग टर्म हा शेअर 83.89% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 02 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या