4 October 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | हलक्यात घेऊ नका, अवघा ₹20,000 पगार असेल तरी बचतीवर 1 कोटी 66 लाख परतावा मिळवू शकता 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना बोनसनंतर आता DA वाढीची प्रतीक्षा, लवकरच मिळणार खुशखबर - Marathi News Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News SBI Mutual Fund | नोकरदार वर्गाच्या खास SBI योजना, डोळे झाकुन SIP करा, परताव्याने पैशाचं टेन्शन मिटेल - Marathi News Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा शेअर पुन्हा पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळणार मोठा परतावा - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबद्दल फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News NBCC Share Price | PSU शेअर फोकसमध्ये, स्टॉक पुन्हा ब्रेकआऊट देणार, यापूर्वी दिला 630% परतावा - Marathi News
x

Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा शेअर पुन्हा पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळणार मोठा परतावा - Marathi News

Highlights:

  • Vodafone Idea Share PriceNSE: Idea – व्होडाफोन आयडिया कंपनी अंश
  • ब्रोकरेज फर्म IIFL सिक्युरिटीजने काय म्हटले
  • स्टॉकबाबत तज्ञांचे मत
Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यापासून फोकसमध्ये आले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये या कंपनीचे (NSE: Idea) शेअर्स 33 टक्क्यांनी घसरले होते. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 72000 रुपये आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

मागील एका महिन्यात या कंपनीचे बाजार भांडवल 34,000 कोटी रुपयेने कमी झाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.06 लाख कोटी रुपये होते. आज गुरूवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 2.95 टक्के घसरणीसह 9.87 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ब्रोकरेज फर्म IIFL सिक्युरिटीजने काय म्हटले
व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या समायोजित सकल महसूल म्हणजेच एजीआरबाबत सप्टेंबरमध्ये झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने एजीआर संबंधित थकबाकीची पुनर्गणना करण्यासाठी व्होडाफोन आयडियाची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली होती. ब्रोकरेज फर्म IIFL सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, या सवलतीशिवाय व्होडाफोन आयडिया कंपनीची लिक्विडीटी फ्लो समस्या आणखी वाढू शकते.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत
तज्ञांच्या मते, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा व्होडाफोन आयडिया स्टॉकवर नकारात्मक परिणाम होणार, मात्र याचा फायदा भारती एअरटेल कंपनीला होऊ शकतो. यामुळे कंपनीच्या मार्केट शेअरमध्ये वाढ होऊ शकते. व्होडाफोन-आयडिया कंपनीची कर्ज उभारणी योजना, भांडवली खर्च टिकवून ठेवण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने व्होडाफोन-आयडिया कंपनीवरील वाढत्या आर्थिक समस्यांमुळे स्टॉकबाबत नकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञाच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स दीर्घ मुदतीत 19 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 03 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x