13 November 2024 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअर नीचांकी किंमतीजवळ आला, पुढे काय करावं, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | सध्या व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर प्राईस वर्षभरातील नीचांकी (NSE: IDEA) पातळीवर आहे. शुक्रवार 8 नोव्हेंबर 2024 रोजी शेअर 2.36% घसरून 7.86 रुपयांवर पोहोचला होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या फ्री फ्लोट शेअर्सची संख्या सुमारे २५.१९ अब्ज आहे. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)

शेअर्स ट्रेडिंग व्हॉल्युम

याशिवाय सरासरी वॉल्यूम 54.26 कोटी इतका आहे. यावरून व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये किती गुंतवणूकदार ट्रेडिंग करत असतील याचा अंदाज येऊ शकतो. मात्र, असं असूनही शेअर गेल्या दिवसांपासून सातत्याने घसरतो आहे.

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांतील नीचांकी किंमत 7.58 रुपये आहे. तसेच व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 19.18 रुपये होती. २०२४ मध्ये आतापर्यंत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर ५३ टक्क्यांनी घसरला आहे.

व्होडाफोन आयडियाच्या शेअर अस्थिर

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात ट्रेड होतोय. त्यामुळे कंपनी शेअरच्या किमतीत किंचितही हालचाल झाल्यास वाढ किंवा घसरण सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेच सध्या गुंतवणूकदारांनी हा शेअर खरेदी करू नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र वरच्या पातळीवर शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांनी हा शेअर ‘HOLD’ करावा असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.

एंजल वन ब्रोकरेज फर्मचा सल्ला

एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी हा ट्रेडिंग स्टॉक आहे. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये मोठा परतावा अपेक्षित असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा चांगला शेअर ठरू शकतो. पण जे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक करतात त्यांनी या शेअरपासून दूर राहावे असा सल्ला देखील एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात या शेअरची किंमत ७ रुपयांपर्यंत घसरली होती. त्यानंतर शेअर पुन्हा तेजीने वाढला होता. मात्र त्या तेजीनंतर हा शेअर पुन्हा त्याच पातळीवर आला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 09 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(117)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x