21 April 2025 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | वेगाने धावणार टाटा मोटर्स शेअर्स, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS GTL Share Price | या बातमीचा जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकवर परिणाम होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: GTLINFRA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा चिल्लर प्राईस पेनी स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 627% परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक होणार रॉकेट, व्होडाफोन-आयडिया कंपनीचा मोठा प्लॅन - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | मागील काही घटनांमुळे वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा शेअर अत्यंत दबावाखाली होता. मागील एक महिन्यात वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा (NSE: IDEA) शेअर 30.82% घसरला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.77 टक्के वाढून 9.16 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.32 टक्के वाढून 9.24 रुपयांवर पोहोचला होता. (वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)

व्होडाफोन आयडियाबाबत मोठा प्लॅन
मॉगलवार 15 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदानात 2024 इंडिया मोबाइल काँग्रेसच्या आठव्या आवृत्तीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी कुमार मंगलम बिर्ला यांनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या मोठ्या प्लॅनची माहिती दिली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांनी माहिती देताना म्हटले की व्होडाफोन आयडियामध्ये लवकरच कायापालट होणार आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला आपल्या कायापालटाचा विश्वास आहे. यापूर्वी अनेकदा आम्ही ते सिद्ध केलं आहे असं देखील ते म्हणाले.

टेलिकॉम कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली
2024 इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन आयडिया लिमिटेड टेलिकॉम कंपनीसाठी निधी गोळा केल्याने कॅपेक्स चक्र पुन्हा सुरू होण्यास मदत झाली आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा FPO ही भारतातील अशा प्रकारची सर्वात मोठी ऑफर असल्याचे कुमार मंगलम बिर्ला यांनी अधोरेखित केले. ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला ९० हजार कोटींहून अधिक रकमेच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या, अशी माहिती दिली.

कंपनीचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंग या तीन जागतिक कंपन्यांशी 3.6 अब्ज डॉलर्सच्या मेगा डील्सचा पहिला टप्पा यापूर्वीच जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या सततच्या पाठिंब्यामुळे पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही आपले योगदान देऊ, असा विश्वास कुमार मंगलम बिर्ला यांनी व्यक्त केला.

तसेच कुमार मंगलम बिर्ला पुढे म्हणाले की, भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर स्पॅम आणि फसवणुकीचा सामना करण्यासाठी “महत्त्वपूर्ण प्रगती” करत आहे आणि आपल्या परिवर्तनाच्या प्रवासात “महत्त्वपूर्ण पावले” उचलली आहेत.

कुमार मंगलम बिर्ला यांनी डिजिटल कनेक्टिव्हिटीचे महत्त्व ओळखून अनेक सुधारणा करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि सांगितले की, डिजिटल परिवर्तन आता मोठ्या व्यवसायांच्या पलीकडे छोट्या आणि मध्यम उद्योगांकडे जात आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीमध्ये आम्ही 4G, IOT, AI आणि क्लाऊड सारख्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून भारताच्या छोट्या व्यवसायांमध्ये डिजिटल परिवर्तनास प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त समर्थन प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत असं कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.

तज्ज्ञांकडून शेअरची रेटिंग अपडेट
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर्सची रेटिंग ‘अंडरवेट’ वरून ‘न्यूट्रल’ मध्ये अपडेट केली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की कंपनी 25,000 कोटी रुपयांचा निधी उभारेल, ज्याचा सकारात्मक फायदा व्होडाफोन आयडिया शेअरला होऊ शकतो. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरची टार्गेट प्राइस 7 रुपयांवरून 10 रुपये केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 16 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या