13 January 2025 10:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Vodafone Idea Share Price | VI कंपनीबाबत फायद्याची अपडेट, 10 रुपयाचा शेअर पुन्हा मालामाल करणार - Marathi News

Highlights:

  • Vodafone Idea Share PriceNSE: VodafoneIdea – व्होडाफोन आयडिया कंपनी अंश
  • महत्त्वपूर्ण करार
  • 5G रोलआउटवर काम सुरु
  • शेअर्स 1 महिन्यात 30% घसरले
Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 11.61 रुपये किमतीवर (NSE: VodafoneIdea) ट्रेड करत होते. तर आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत 4G नेटवर्कच्या विस्तारासाठी आणि 5G रोलआउटसाठी तीन वर्षांच्या कालावधीत दूरसंचार उपकरणे खरेदी करण्याचा 3.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 30,000 कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

महत्त्वपूर्ण करार
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल विरुद्ध बाजारपेठेतील स्पर्धात्मकता टिकून राहावी आणि ग्राहकांचे नुकसान टाळता यावे यासाठी हा करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आज मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 1.20 टक्के घसरणीसह 10.69 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या भांडवली खर्च कार्यक्रमाचे उद्दिष्ट 4G कव्हरेज 1.03 अब्जवरून वाढवून 1.2 अब्ज करणे आहे.

5G रोलआउटवर काम सुरु
या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट भारतीय बाजारपेठेत 5G सेवा लाँच करणे, आणि डेटा वाढीच्या अनुषंगाने क्षमता वाढवणे हे आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान भागीदार नोकिया आणि एरिक्सनसोबत काम करत आहे. यासह कंपनीने सॅमसंगला देखील नवीन भागीदार म्हणून जोडले आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी पुढील तिमाहीत 4G नेटवर्क विस्तार आणि 5G रोलआउटवर काम करत आहे.

शेअर्स 1 महिन्यात 30% घसरले
मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने एजीआर प्रकरणात व्होडाफोन आयडिया कंपनीची याचिका फेटाळल्यानंतर आणि एजीआर मागणीची संपूर्ण रक्कम कायम ठेवल्यानंतर शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. मागील आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 24 टक्क्यांनी घसरला होता. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 15 टक्के घसरला होता. गेल्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 30 टक्के घसरले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(147)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x