15 January 2025 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, हा पेनी शेअर किती फायद्याचा ठरणार - Marathi News

Highlights:

  • Vodafone Idea Share PriceNSE: VodafoneIdea – व्होडाफोन आयडिया कंपनी अंश
  • व्होडाफोन आयडिया कंपनीने करार केला
  • कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली
Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंग या कंपन्यासोबत (NSE: VodafoneIdea) तीन वर्षांत नेटवर्क उपकरणांच्या पुरवठ्यासाठी 3.6 अब्ज डॉलर्सचा करार केला असल्याची माहिती दिली आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर सोमवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 8.96 टक्क्यांच्या वाढीसह 11.42 रुपये किमतीवर पोहचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

व्होडाफोन आयडिया कंपनीने करार केला
आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.58 टक्के घसरणीसह 10.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत व्होडाफोन आयडिया कंपनीने तीन वर्षांच्या भांडवली खर्च योजनेचा भाग म्हणून करार केला आहे. या भांडवली खर्च योजनेचे एकूण मुल्य 6.6 अब्ज डॉलर्स आहेत. व्होडाफोन आयडिया कंपनीचे उद्दिष्ट 4G कव्हरेज 1.03 अब्ज लोकांवरून वाढवून 1.2 अब्ज लोकांपर्यंत पोहोचवणे, महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये 5G सेवा लाँच करणे, आणि वाढती डेटा मागणी पूर्ण करण्याची क्षमता साध्य करणे, हे आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीने इक्विटी शेअर्सद्वारे 240 अब्ज रुपये भांडवल उभारणी केल्यानंतर आणि जून 2024 च्या लिलावात 35 अब्ज रुपये मूल्याचे स्पेक्ट्रम संपादन केल्यानंतर कंपनीने ‘क्विक विन’ कॅपेक्स उपक्रम लाँच केला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यमान साइट्समध्ये अधिक स्पेक्ट्रम जोडून नेटवर्क क्षमतेत 15 टक्के वाढ करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे.

कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली
व्होडाफोन आयडिया कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, दीर्घकालीन कॅपेक्ससाठी कंपनी 250 अब्ज रुपये भांडवल सुविधा आणि 100 अब्ज रुपये नॉन-फंड-आधारित सुविधा सुरक्षित करण्यासाठी विद्यमान गुंतवणूकदारांसोबत चर्चा करत आहोत. मागील आठवड्यात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन आयडिया कंपनीचे एजीआर थकबाकी पुनर्गणनेशी संबंधित अपील फेटाळल्यानंतर व्होडाफोन आयडिया स्टॉक घसरला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(148)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x