19 November 2024 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS
x

Vodafone Idea Share Price | वोडाफोन-आयडिया शेअर 7 रुपये 75 पैशांवर आला, घसरणीचे कारण? स्टॉक डिटेल्स वाचा

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | एकेकाळी आपल्या शेअर धारकांना मालामाल बनवणाऱ्या या शेअरची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. केवळ शेअर धरकाच नाही तर, कंपनीचे प्रवर्तकही आपले पैसे काढून घेत आहेत. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, ‘व्होडाफोन-आयडिया’. ही कंपनी भारतातील दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक मानली जाते. 17 एप्रिल 2015 रोजी आयडिया कंपनीचे शेअर्स 118.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, परंतु आता व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होऊन शेअर्स 7.75 रुपये किमतीवर आले आहेत. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी व्होडाफोन-आयडिया कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के घसरणीसह 7.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीची एजीआर थकबाकी आणि सतत होणारा तोटा यामुळं VI कंपनीचे शेअर्स सातत्याने कमजोर होत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)

16 मे 2007 रोजी आयडिया कंपनीचे शेअर्स 56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर 24 ऑक्टोबर 2008 रोजी तो हा स्टॉक पडून 22.26 रुपयांवर पोहचला होता. या किमतीपासून आयडियाच्या शेअरमध्ये तेजी आली, आणि 17 एप्रिल 2015 रोजी आयडिया कंपनीचे शेअर्स 118.96 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 5 वर्षांत व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या शेअर धारकांचे 88.85 टक्के नुकसान झाले आहे. मागील एका वर्षात या शेअरमध्ये 48 टक्क्यांपेक्षा अधिक पडझड पाहायला मिळाली आहे. Vi कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 15.75 रुपये होती, तर नीचांक पातळी किंमत 7.60 रुपये आहे.

खरेदी, विक्री, होल्ड, :
व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावण्या आधी तज्ञांचे मत जाणून घेणे फायद्याचे राहील. शेअर बाजारातील एकूण 19 तज्ञापैकी 6 तज्ञ शेअर होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत. तर 10 तज्ञांनी स्टॉक त्वरित विक्रिन बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे 3 तज्ञांनी शेअर वाढत असताना जेव्हा संधी मिळेल तेव्हा हा स्टॉक विकून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

कंपनीचे प्रमोटर्स देखील अविश्वास दाखवत आहेत :
व्होडाफोन-आयडिया कंपनीचे प्रवर्तक देखील कंपनीमध्ये भांडवल लावण्यास उत्सुक दिसत नाही. Vi कंपनीचे प्रवर्तक जास्तीत जास्त 2,000-3,000 कोटी रुपये लावण्यास तयार आहे, मात्र ही रक्कम कंपनीला पुनरुज्जीवित करण्यासाठी पुरेशी नाही. ” व्होडाफोन आयडिया कंपनीला जिवंत ठेवण्यासाठी किमान 40,000-45,000 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. समजा बँकाकडून त्यातील निम्मा निधी मिळवला तरी उरलेली रक्कम कंपनीच्या प्रवर्तकांना जमा करावी लागेल. आणि कंपनीचे प्रवर्तक या भांडवल उभारणीसाठी उत्सुक दिसत नाही आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price 532822 in focus check details on 06 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x