18 November 2024 6:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकची रेटिंग अपग्रेड, शेअर 35 टक्क्याने वाढू शकतो, मालामाल करणार

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीचे शेअर्स बुधवारी मजबूत तेजीत वाढत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स बुधवारी 13 टक्के वाढीसह 15.05 रुपये किमतीवर पोहचले होते.

मंगळवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये 17 टक्के घसरण पहायला मिळाली होती. मागील एका महिन्यात या टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. रेटिंग एजन्सी केअर रेटिंग्सने व्होडाफोन आयडिया स्टॉकची दीर्घकालीन रेटिंग B+ वरून BB+ अशी अपग्रेड केली आहे.

आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.02 टक्के वाढीसह 15.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. केअर रेटिंग फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉकची शॉर्ट टर्म रेटिंग A4 वरून A4+ अशी अपग्रेड केली आहे. मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. अवघ्या एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 110 टक्केपेक्षा जास्त वाढले आहे.

5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 5 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.05 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 6 महिन्यांत व्होडाफोन आयडिया स्टॉक 16 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 18.42 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 7.03 रुपये होती.

ब्रोकरेज हाऊस UBS ने व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सवर न्यूट्रल रेटिंग जाहीर केली होती. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक पुढील 12 महिन्यांत 18 रुपये किमतीवर जाऊ शकतो. UBS फर्मला विश्वास आहे की, मंगळवारच्या क्लोजिंग लेव्हलवरून व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 35 टक्के वाढू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE 06 June 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x