18 November 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअरची किंमत 14 रुपये, फायद्याची अपडेट येताच शेअर्समध्ये उसळी, नेमकं कारण काय?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | आर्थिक अडचणीत अडकलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनीने आवश्यक निधी उभारण्यासाठी मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आपली फायबर मालमत्ता विकण्यासाठी गुंतवणूकदारांचे मत मागविले आहे. अंतिम फेरी गाठली आहे. या आठवड्याच्या भारत सरकारने देखील व्होडाफोन आयडिया कंपनीचे अधिग्रहण करण्यास नकार दिला आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान केले आहे. या कंपनीच्या शेअरचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरले आहे. मात्र तरीही व्होडाफोन आयडिया कंपनी या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हा शेअर (18 डिसेंबर 2023) 1.07% वाढून 14.20 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार व्होडाफोन आयडिया कंपनी विविध खाजगी इक्विटी गुंतवणूकदार कंपन्यांशी फायबर मालमत्ता विकून निधी उभारण्यासाठी आणि बिल्डिंग सोल्यूशन्सबाबत चर्चा करत आहे. या डीलद्वारे व्होडाफोन आयडिया कंपनीला 10 ते 12 हजार कोटी रुपये रुपये भांडवल जमा होण्याची अपेक्षा आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी आपली फायबर मालमत्ता विकून दीर्घकालीन भाडेपट्टीवर पायाभूत सुविधा घेणार आहे. आणि यासाठी व्होडाफोन आयडिया कंपनीने विविध कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 0.72 टक्क्यांच्या वाढीसह 14.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली होती. या वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या स्टॉकची किंमत 78 टक्क्यांनी वाढली आहे.

मागील 5 वर्षांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांनी आपले 1.39 लाख कोटी रुपये गमावले आहेत. व्होडाफोन आयडिया कंपनी सध्या रोख तुटवद्याच्या समस्येला तोंड देत आहे. यासह सरकारी थकबाकी न भरल्यामुळे भारत सरकारने व्होडाफोन आयडिया कंपनीचे 33 टक्के भाग भांडवल अधिग्रहित केले आहे. मात्र भारत सरकारने ही कंपनी ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE 18 December 2023.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(121)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x