6 July 2024 3:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 06 जुलै 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HUDCO Share Price | PSU शेअरमधून मोठी कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा, 1 वर्षात 452% परतावा दिला Inox Wind Share Price | मालामाल करणार आयनॉक्स विंड शेअर, यापूर्वी 900% परतावा दिला, आली फायद्याची अपडेट Bonus Share News | मिळतील फ्री शेअर! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी शेअरने 705% परतावा दिला NHPC Share Price | या PSU शेअरची प्राईस मोठी उंची गाठणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा Vedanta Share Price | वेदांता शेअर्सची जोरदार खरेदी सुरू, कंपनीबाबत फायद्याचा रिपोर्ट, स्टॉकला होणार फायदा Hot Stocks | सॉलिड प्राइस व्हॉल्यूम ब्रेकआउटवर ट्रेड करणारे 10 शेअर्स BUY करा, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल
x

Vodafone Idea Share Price | हा पेनी शेअर खरेदी करा, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत. भारतातील टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स सध्या मजबूत तेजीत आले आहेत. कारण या कंपन्यांनी आपल्या मोबाईल सेवा शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. यामुळे एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 23 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

नुकताच Citi फर्मने देखील व्होडाफोन आयडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 23 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.00 टक्के वाढीसह 17.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. Citi फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, व्होडाफोन आयडिया कंपनीला AGR प्रकरणात दिलासा मिळू शकतो. तसेच कंपनीच्या कर्जात लक्षणीय घट होऊ शकते.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, भारतातील टेलिकॉम कंपन्यांनी मागील दोन वर्षांपासून टॅरिफ वाढवलेले नव्हते. आता मात्र सर्व कंपन्यांनी आपल्या टॅरिफमध्ये प्रचंड वाढ केली आहे. याचा सर्वात मोठा फायदा व्होडाफोन आयडिया कंपनीला मिळू शकतो. कारण या कंपनीचा ताळेबंद मागील काही वर्षांपासून कमजोर स्थितीत होता. आता टॅरिफ वाढ केल्याने कंपनीच्या महसुलात सुधारणा पाहायला मिळू शकते.

रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी 11-25 टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या टॅरिफ दरात झालेली वाढ 3 जुलै 2024 पासून लागू करणार आहेत. तर व्होडाफोन कंपनी आपली टॅरिफ वाढ 4 जुलै 2024 पासून लागू करणार आहे. दैनंदिन डेटा प्लॅन हे मोबाईल ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत, त्यासाठी ग्राहक सरासरी 17 रुपये देत होते, आता त्यात 19 टक्केची वाढ झाली आहे.

HSBC फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, व्होडाफोन आयडिया कंपनी नेटवर्क गुंतवणुकीच्या बाबतीत प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे असल्याने त्यांचा टेलिकॉम मार्केटमधील वाटा कमी होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीने आपल्या नेटवर्क कव्हरेज आणि क्षमता सुधारण्यात लक्ष केंद्रित केले पाहिजे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 03 July 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x