15 January 2025 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून व्होडाफोन आयडिया स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. आज मात्र हा स्टॉक किंचित वाढला आहे. गुरुवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.50 टक्क्यांच्या वाढीसह 13.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांनी, व्होडाफोन आयडिया स्टॉकवर ‘सेल’ कॉल दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.38 टक्के वाढीसह 13.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉकला हाय रिस्क, हाय रिवॉर्ड स्टॉक म्हणून रेटिंग दिली आहे. तज्ञांच्या मते, तेजीच्या काळात हा स्टॉक 23 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ब्रोकरेज हाऊसच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागू शकतो. कोटक फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 10 रुपये किमतीवर येऊ शकतो.

व्होडाफोन आयडिया कंपनीने नुकताच आपला FPO पूर्ण केला आहे. यात कंपनीने मोठा निधी जमा केला, ज्याचा विनियोग थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी करण्यात आला आहे. कंपनीवर अजूनही कर्जाचे डोंगर आहे. त्यामुळे कंपनीला आणखी भांडवलाची गरज आहे. मार्च 2024 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा निव्वळ तोटा 7,307.20 कोटी रुपये ते 7,680 कोटी रुपये दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल 10,690 कोटी रुपये राहण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 17 May 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(148)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x