22 November 2024 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 16 रुपये! आज 1 दिवसात 20% परतावा, स्टॉक खरेदी वाढण्याचे कारण काय?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यांपासून व्होडाफोन आयडिया कंपनीचा स्टॉक गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून देत आहे. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनी खूप मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जात आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीने भांडवल उभारणी करण्यासाठी डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत निश्चित केली होती. मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होऊ लागली आणि भांडवल उभारणीची चर्चा थांबली. आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 21.51 टक्के वाढीसह 16.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील सहा महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये भांडवल उभारणीच्या बातम्यांमुळे तेजी पाहायला मिळत आहे.

याव्यतिरिक्त पूर्व-निर्धारित किंमतीवर कंपनीवरील कर्जाचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्याची शक्यता, हे देखील स्टॉक वाढीचे एक कारण आहे. अशा व्यवहारांमध्ये खाजगी क्रेडिट फंड आणि विशेष फंडिग कंपनीचा सहभाग असतो हे कर्ज परतफेडीसाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी देतात.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समधील सध्याच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना भीती आहे की, भांडवल उभारणी नंतर या कंपनीचे शेअर्स वाढणार नाहीत. याशिवाय कंपनीचे प्रवर्तक असलेले आदित्य बिर्ला समूह आणि ब्रिटनचा व्होडाफोन समूह कर्जदात्यांना कॉर्पोरेट हमीच्या स्वरूपात अतिरिक्त तारण म्हणून शेअर्स देत नाहीत. निधी उभारण्यासाठी व्होडाफोन आयडिया कंपनी विविध कंपनीशी आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. आधीच व्होडाफोन आयडिया कंपनीने दूरसंचार बाजारातील खूप मोठा वाटा गमावला आहे.

2023 या वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ग्राहक संख्येत घट पाहायला मिळाली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये या कंपनीने 7.5 लाख मोबाइल ग्राहक गमावले होते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या आकडेवारीनुसार रिलायन्स जिओ कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये 34.7 लाख नवीन ग्राहक मिळवले आहे. आणि एअरटेल कंपनीच्या ग्राहकांची संख्या 13.2 लाखने वाढली आहे.

व्होडाफोन कंपनीने जून 2023 मध्ये आपल्या व्यवसायाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या योजने अंतर्गत 14,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यात कंपनीमध्ये 7,000 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करून आणि उर्वरित 7,000 कोटी रुपये थेट इक्विटी किंवा पवर्तनीय संरचनेद्वारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सप्टेंबर 2023 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 8737.9 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 7595.5 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 29 December 2023.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x