24 April 2025 12:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी स्टॉक पुन्हा तेजीत; 5 वर्षात 2,028% परतावा दिला, टार्गेट अपडेट जाणून घ्या - NSE: TTML Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, सुस्तावलेला स्टॉक पैसा वसूल करणार - NSE: TATATECH Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल
x

Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | भारतीय दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’ कंपनीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. कंपनीवरील वाढते कर्ज, आणि आवश्यक निधी उभारण्यात होणारा उशीर यामुळे कंपनी लागले आपले ऑपरेशन्स बंद करावे लागणार आहे. ब्रोकरेज फर्मने दिलेल्या माहितीनुसार महागाईचा दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अपेक्षित पातळीवर राहिल्यास पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर जून 2024 मध्ये अनेक दूरसंचार कंपन्या टेरिफ दर वाढवू शकतात. ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.13 टक्के घसरणीसह 5.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांची नवीन नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. (Vodafone Idea Limited)

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने जाहीर केल्या अहवालात म्हटले आहे की, ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनी टॅरिफ वाढ करु शकत नाही, आणि त्यामुळे कंपनी 5G साठी आवश्यक गुंतवणूक करण्यास सक्षम नसून कंपनी 5G सेवा सुरू करू शकणार नाही. यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कंपनीची भांडवल उभारणीची योजना प्रत्यक्षात आणणे खूप कठीण आहे. यामुळे बाजारात ‘रिलायन्स जिओ’ आणि ‘भारती एअरटेल’ या दोनच कंपन्या राज्य करतील. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रात या दोन्ही कंपनीची मक्तेदारी निर्माण होणार आहे.

ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार टेलिकॉम कंपन्या केंद्रीय सार्वत्रिक निवडणुकीनंतर जून 2024 मध्ये टॅरिफचे मूल्य वाढवणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे किरकोळ महागाई RBI च्या कम्फर्ट झोनच्या बाहेर गेली आहे. टॅरिफ वाढण्यास विलंब झाल्यामुळे ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीला नकारात्मक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ही कंपनी बाजारात टिकून राहील की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. परिणामी दूरसंचार क्षेत्रात फक्त दोन कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होईल. व्होडाफोन आयडिया कंपनीला 4G कव्हरेज वाढवण्यासाठी आणि 5G सेवा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीची गरज आहे. कंपनीने भांडवल उभारणी न केल्यास त्याचा दूरसंचार बाजारातील हिस्सा कमी होत राहील, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

तज्ज्ञांच्या मते, ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीसामोरे पुढील 12 महिन्यांत 5,500 कोटी रुपयांच्या रोख तुटवड्याची समस्या निर्माण होऊ शकते. दर वाढ न केल्यामुळे किंवा भांडवल उभारणीस उशीर न झाल्यास कंपनीला आपले कामकाजही बंद करावे लागण्याची शक्यता आहे. कंपनीवर 2.3 लाख कोटींहून अधिक कर्ज असून आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपनीच्या वाटा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीला इतक्या अल्प कालावधीत भांडवल उभारणे कठीण जाणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price on 28 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या