16 January 2025 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Wedding Insurance | वेडिंग इन्शुरन्स घेण्याचे जबरदस्त लाभ, आता पॉलिसीमधून उचला लग्नाचा खर्च, जाणून घ्या फायद्याची बातमी . Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल NTPC Share Price | पीएसयू NTPC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार हा शेअर, टार्गेट नोट करा - NSE: NTPC Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरबाबत UBS ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA EPFO Minimum Pension | खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, EPFO कडून महिना किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरबाबत UBS ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली होती. या तेजीत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. मागील ३ दिवसांपासून व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या पाच दिवसांत व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये 13.57 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे.

व्होडाफोन आयडिया शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 1.26 टक्क्यांनी वाढून 8.87 रुपयांवर पोहोचला होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 19.18 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांचा नीचांकी पातळी 6.61 रुपये होती. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 61,754 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान, टॉप ब्रोकरेज कंपन्यांनी व्होडाफोन आयडिया शेअरच्या टार्गेट प्राइसमध्ये कपात केली आहे.

यूबीएस ब्रोकरेज फर्म – व्होडाफोन आयडिया शेअर टार्गेट प्राइस

यूबीएस ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरची ‘BUY’ रेटिंग कायम ठेवली आहे. मात्र, यूबीएस ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरची टार्गेट प्राइस पूर्वीच्या १९ रुपयांवरून १३ रुपये केली आहे. म्हणजे ब्रोकरेजने टार्गेट प्राईसमध्ये जवळपास 32% कपात केली आहे. म्हणजे शेअर सध्याच्या पातळीपासून सुमारे 50% परतावा देईल आहे.

ब्रोकरेजने पुढे काय म्हटले

यूबीएस ब्रोकरेज फर्मला अशी अपेक्षा आहे की व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा टॅरिफ वाढीचा उर्वरित लाभ 3.5 दशलक्ष ग्राहकांच्या मदतीने भरून निघेल, परिणामी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या मोबाइल महसुलात तिमाही-दर-तिमाही 2.8% वाढ होईल.

13 विश्लेषकांकडून ‘SELL’ रेटिंग

व्होडाफोन आयडिया शेअरसाठी २२ स्टॉक मार्केट विश्लेषकांपैकी केवळ चार विश्लेषकांनी ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. मात्र १३ विश्लेषकांनी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. तर पाच विश्लेषकांनी ‘न्यूट्रल’ रेटिंग जाहीर केली आहे. मागील वर्षभरात व्होडाफोन आयडिया शेअर जवळपास 43.68 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र पाच वर्षांत शेअरने 97.11 टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Thursday 16 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(150)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x