19 December 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मचे मोठे संकेत, स्टॉक तेजीत येणार की कोसळणार - NSE: IDEA Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या Post Office Saving | बँकांपेक्षा पोस्टात सेविंग अकाउंट उघडण्याचे जबरदस्त फायदे ठाऊक आहेत का, इथे घ्या योग्य माहिती RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मोठी कमाई होईल, आयपीओ डिटेल्स नोट करा - GMP IPO HAL Share Price | डिफेन्स HAL कंपनी शेअरसहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL SIP Crorepati Formula | 'या' फॉर्म्युलाच्या मदतीने जो व्यक्ती SIP करेल तो करोडपती बनल्याशिवाय राहणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मचे मोठे संकेत, स्टॉक तेजीत येणार की कोसळणार - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | देशांतर्गत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरवरील आपले ‘होल्ड’ रेटिंग कायम ठेवताना टार्गेट प्राईस कमी केली आहे. दरम्यान, व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये गेल्या महिनाभरात ८ टक्क्यांची वाढ झाली असली तरी गेल्या वर्षभरात शेअर ५४ टक्क्यांनी घसरला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस घटवून ८.६० रुपये केली आहे. गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 1.80 टक्के घसरून 7.65 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यात हा शेअर 54.79 टक्क्यांनी घसरला आहे.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने पुढे म्हटले आहे की, ‘नुकत्याच झालेल्या टॅरिफ दरवाढीमुळे व्होडाफोन आयडियाच्या प्रति युजर सरासरी महसुलात (एआरपीयू) वाढ झाली असली, तरी महसुलात मात्र किरकोळ वाढ झाली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीला पुढील दोन तिमाहीपर्यंत एआरपीयू आणि महसुलात दरवाढीचा परिणाम दिसून येईल, असा अंदाज ब्रोकरेजने व्यक्त केला आहे.

नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने गेल्या महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअरची ‘बाय’ रेटिंग कायम ठेवली होती. नोमुरा ब्रोकरेजने म्हटले आहे की, ‘4G लोकसंख्या कव्हरेज आणि 5G रोलआउट गती देण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीमुळे व्होडाफोन आयडिया कंपनी आर्थिक वर्ष 2027 मध्ये माफक वाढीच्या मार्गावर परत येईल अशी अपेक्षा आहे.

व्होडाफोन आयडिया शेअरने टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात व्होडाफोन आयडिया शेअर 1.67% घसरला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 7.75% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 54.49% घसरला आहे. मागील १ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअर 45% घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 17.56% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये व्होडाफोन आयडिया शेअर 85.12% घसरला आहे. तसेच YTD आधारावर व्होडाफोन आयडिया शेअर 54.71% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x