25 December 2024 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात गरिबांना करोडपती केलं, सतत पैशाचा पाऊस पाडणारा शेअर - Penny Stocks 2024 SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया शेअरने एका महिन्यात 51 टक्के परतावा दिला, 11 रुपयाचा शेअर पुन्हा मल्टिबॅगर होणार?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 51 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर 9.63 टक्के वाढीसह 11.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 5.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 109.65 टक्के मजबूत झाला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.71 टक्क्यांच्या वाढीसह 11.73 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी व्होडाफोन-आयडिया स्टॉक 0.85 टक्के घसरणीसह 11.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सीईओने दिलेली माहिती

व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 57,101.28 कोटी रुपये आहे. सध्या व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनी इक्विटी फंडिंगच्या संदर्भात चर्चेचा विषय बनली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या सीईओनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांत इक्विटी आणि इक्विटी लिंक्ड साधनांच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याबाबत गुंतवणूकदारांच्या अनेक गटांशी चर्चा सुरू केली आहे. पुढील काही तिमाहीत कंपनी भांडवलाची व्यवस्था पूर्ण करेल अशी माहिती कंपनीच्या सीईओने दिली आहे.

तज्ञांचे मत

ब्रोकरेज फर्म Tips2Trades च्या तज्ञांच्या मते व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 11.80 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमत पातळीवर नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 9 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 12 रुपये किमतीच्या आसपास प्रतिकार पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Vodafone Idea Share Price today on 18 September 2023

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x